अकलूज: पोलिसांच्या जाचाला कंटाळून दिव्यांग व्यक्तीने केली आत्महत्या

अकलूज: पोलिसांच्या जाचाला कंटाळून दिव्यांग व्यक्तीने केली आत्महत्या

पोलीस कर्मचाऱ्यांकडून सततच्या त्रासाला कंटाळून आदम तांबोळी (वय-45) यांनी विषारी औषध प्राशन करुन आत्महात्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आदम तांबोळी हे दिव्यांग होते.

  • Share this:

अकलूज, 15 जून- पोलीस कर्मचाऱ्यांकडून सततच्या त्रासाला कंटाळून आदम तांबोळी (वय-45) यांनी विषारी औषध प्राशन करुन आत्महात्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आदम तांबोळी हे दिव्यांग होते. नातेवाईकांनी आदम यांचा मृतदेह अकलूज पोलिस स्टेशनच्या आवारात आणला असून त्यांनी आंदोलन सुरु केले आहे.आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही, असा पवित्रा आदम यांच्या नातेवाईकांनी घेतला आहे. मात्र, अकलुज पोलीसांनी याबाबत अद्यात कोणतीही दखल घेतली नाही.

काय आहे हे प्रकरण?

आदम तांबोळी यांचे जुन्या पोलीस स्टेशनसमोर पानटपरी आहे. तांबोळी यांनी आपल्या ओळखीतील एका महिलेस अडचणीच्या वेळी खासगी फायनान्समधून तीस हजार रुपये काढून दिले होते. त्यातील काही रक्कम त्या महिलेने हप्त्याने भरले. परंतु उर्वरित राहिलेले हप्ते न भरल्यामुळे आदम तांबोळी हे त्या महिलेकडे पैसे मागण्यासाठी जात होते. तांबोळी यांनी पैशाचा तगादा लावल्याने हप्ते भरता येत नाहीत, म्हणून सदर महिला अकलूज पोलीस ठाण्यात गेली होती. त्यावेळेस तेथील ठाणे अंमलदार हेंबाडे यांनी फोन करून आदम तांबोळी यांना बोलून घेऊन त्यांना शिवीगाळ करत त्यांच्या शारीरिक व्यंगावर टीका केली होती. 'ए लंगड्या पैसे मागू नकोस,' असा दम दिला होता. 'पुन्हा या महिलेस पैसे मागितले तर तुला मार देईन, अशी धमकी दिली. त्यामुळे आदम तांबोळी यांनी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घरातील लोकांनी वेळीच त्यांना अकलुजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर तांबोळी यांना घरी सोडले होते. आदम तांबोळी हे झालेल्या प्रकाराबद्दल पत्रकार परिषद घेणार होते. तांबोळी हे आपल्या विरोधात संध्याकाळी पाच वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत, हे पोलीस हेंबाडे यांना समजले. हेंबाडे यांनी दुपारी तांबोळी यांचे पानटपरीवर जाऊन पुन्हा दम दिला. 'तुझी पानपट्टी काढून टाकतो. कोणी माझं वाकडं करत नाही,' अशी धमकी दिली. त्यानंतर तांबोळी यांना हेबाडेचा त्रास असह्य झाला व पोलीसच आपल्याला न्याय देण्याऐवजी अन्याय करु लागल्याने तांबोळी यांनी पुन्हा औषध प्राशन करुन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्या मुलाने व पत्नीने अकलूज येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दरम्यान, तांबोळी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

तांबोळी यांची पत्नीचे व मुलाचे म्हणणे आहे की, याबाबत वरिष्ठ पातळीवर या तपास करुन योग्य ती कारवाई करावी. तांबोळी हे अपंग असल्याने माळशिरस तालुका प्रहार अपंग संघटनेची याबाबत पोलीसांची भूमिका बघून पोलीस हेमाडे यांचेवर योग्य ती कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. हेंबाडे पोलिसांचा मोबाईल चेक करावा व पोलिस स्टेशचे सीसीटीव्ही फुटेज चेक करावे, अशी मागणी होत आहे.

VIDEO: 10 जणांचा चावा घेणारे माकड वन विभागाच्या पिंजऱ्यात

First published: June 15, 2019, 1:48 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading