पुणे,15 मार्च : कोंढव्यात महापालिकेच्या उद्यानात आज जिवंत हँडग्रेनेड सापडल्यानं खळबळ उडाली आहे. इथल्या दोराबजी मॉलसमोर हे उद्यान असून सध्या उद्यानाच्या नुतनीकरणाचं काम सुरू आहे.
कोंढव्यातील दोराबजी मॉलसमोर महापालिकेच्या उद्यानाच्या विकसनाच काम सुरू आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बॉँबसदृश वस्तू दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे .या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर बीडीडीएस आणि कोंढवा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत कामासाठी कंत्राटदाराने मुळशी येथून लाल माती ट्रकने भरून आणली होती त्यातून हा ग्रेनेड मातीसोबत आला असावा अशी शक्यता वाटतेय. ग्रेनेडच्या सिरीयल नंबरवरून पुढील तपास करण्यात येतोय.
त्यामुळे आता पुण्यात पुन्हा घातपाताची शक्यता तर नव्हती ना हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Development, Handgrened, Maharashtra, Pune, भारत, विकास