हमीद दलवाईंनी काढला होता तलाकविरोधात पहिला मोर्चा

हमीद दलवाईंनी काढला होता तलाकविरोधात पहिला मोर्चा

तिहेरी तलाक बंदीचं श्रेय लाटण्यासाठी आज अनेकजण पुढे सरसावलेत पण या प्रथेविरोधात दिवंगत हमीद दलवाईची १८ एप्रिल १९६६ साली पहिला मोर्चा काढला होता. त्यात सात मुस्लिम महिला सहभागी झाल्या होत्या

  • Share this:

हलीमा कुरेशी, प्रतिनिधी

पुणे, 28 डिसेंबर : सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने तिहेरी तलाकसंदर्भात ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर आज लोकसभेतही तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयकाला मंजुरी देण्यात आलीये. हा निकाल आल्यानंतर दिवंगत हमीद दलवाईची प्रकर्षाने स्मरण होतंय. १८ एप्रिल १९६६ साली त्यांनी पहिल्यांदा सात तलाकपीडित महिलांना घेऊन मुंबईत विधानभवनावर मोर्चा काढला होता. यावर्षी या घटनेला नुकतीच ५० वर्ष पूर्ण झालीत.

हमीद दलवाई यांनी आपल्या लिखाणातून तिहेरी तलाक प्रथेविरोधात नेहमीच आवाज उठवला होता. महिलांना समान अधिकार आणि हक्क मिळावे यासाठी त्यांनी सुरू केलेला लढा ऐतिहासिक होता. संपूर्ण समाजाचा रोष पत्करून तिहेरी तलाकविरुद्धचा लढा प्रखरपणे सुरू केला. इंधन, लाट , भारतातील मुस्लिम राजकारण, अशा पुस्तकातून त्यांनी तोंडी तलाक प्रथेला प्रखरपणे विरोध केला. त्यांच्या या पुरोगामी भूमिकेमुळे कट्टर मुस्लिमांच्या रोषाला त्यांना बळी पडावं लागले पण त्यांनी आपला लढा चालूच ठेवला. १९७७ मध्ये दलवाईंचं मूत्रपिंडविकाराने निधन झालं. यानंतर सय्यदभाई, हुसेन जमादार, शमशुद्दीन तांबोळी यांनी चळवळीत जीव ओतला. प्रा. मुमताज रहिमतपूरे अशा महिला या लढ्यात सहभागी झाल्या.

१९८५ मध्ये शहाबानो खटला सुरू होता. संपूर्ण देश ढवळून निघाला होता. सायराबानोने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. त्यानंतर अनेक याचिका दाखल झाल्या.

न्यूज18 लोकमतच्या चर्चेत सहभागी झालेल्या सय्यदभाईंना तेव्हा अश्रू अनावर झाले. ८२ वर्षांचे सय्यदभाई हमीद दलवाई बरोबर तोंडी तलाकच्या विरोधात उभे राहिले, आज हमीद दलवाई त्यांच्या मेहरुंनिसा दलवाई हयात नाहीत. पण हमीद दलवाईंनी तिहेरी तलाकविषयी उभारलेल्या लढ्यात अनेक तलाकपिडीत महिला सहभागी झाल्या. अनेकजणी सावरल्या. तलाकविरोधी कायदा झाल्यावर अनेक महिलांना न्याय मिळणार आहे. हमीद दलवाइंनी सुरूवात केली नसती तर तलाकमधून मुक्तता जवळपास अशक्यच होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 28, 2017 08:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading