निम्मा महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत, 18 जिल्ह्यांत 50 टक्केही पाऊस नाही !

निम्मा महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत, 18 जिल्ह्यांत 50 टक्केही पाऊस नाही !

तर 11 जिल्यात 75 टक्के पाऊस झालाय. राज्यातील 51 तालुक्यात 25 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालंय.

  • Share this:

प्रफुल्ल साळुंखे, प्रतिनिधी, मुंबई

14 आॅगस्ट : पावसाने ओढ दिल्याने निम्मा महाराष्ट्र दुष्काळाच्या खाईत लोटलाय. 18 जिल्ह्यात पावसानं 50 टक्के  सरासरी गाठलेली नाही. तर 11 जिल्यात 75 टक्के पाऊस झालाय. राज्यातील 51 तालुक्यात 25 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालंय. त्यातही पावसाने मोठी ओढ दिल्याने मूग, उडीद, सोयाबीन, तूर , धान ही पीक हातातून गेलीय. तर उर्वरित ठिकाणी किडीचा मोठा प्रादुर्भाव झाल्यानं संपुर्ण राज्यातील शेतकरीच संकटात सापडलाय. या सर्वांचा परिणाम म्हणून राज्यात कडधान्य, तेलबिया, आणि तृणधान्य याच्या उत्पादनात मोठी घट होण्याची भीती आहे. राज्यात यंदा ठाणे, पालघर, नंदुरबार, पुणे या जिल्ह्याना वगळता सर्वत्र पावसानं दांडी मारलीय.

विभागवार परिस्थिती पहिली तर

नाशिक विभाग

4 तालुक्यात 25 टक्के, 10 तालुक्यात 50 टक्के तर 13 तालुक्यात 75 टक्के पेक्षा अधिक पाऊस पडला. या विभागात धुळे जळगाव जिल्ह्यात मूग, उडीद आणि तूर पीक सुकली आहेत

पुणे विभाग

10 तालुक्यात 50 टक्के पेक्षा कमी पाऊस झालाय.

दौंड, बारामती, पुरंदर, इंदापूर, तर अहमदनगरमध्ये अकोला वगळता सर्व भगत पीक सुकली आहेत. अकोलकोट, उत्तर आणि दक्षिण सोलापूर पीक सुकली.

कोल्हापूर विभाग

33 तालुक्यांपैकी 15 तालुक्यात 50 टक्के पेक्षा कमी पाऊस झालाय.  खटाव, जय, आटपाडी, मिरज, या तालुक्यातले पीक सुकली.

औरंगाबाद विभाग

सर्वाधिक भीषण अवस्था या विभागात असून 28 तालुक्यापैकी 17 तालुक्यात 50 टक्के पेशा कमी पाऊस झालाय. पैठण, गंगापूर, खुलताबाद, सोयगाव, आष्टी, माजलगाव, गेवराई, जालना, अंबड, घनसावंगी, बदनापूर तालुक्यात पीक सुकू लागली आहेत.

याच विभागात लातूर कृषी विभागातील - पावसाने ओढ दिल्यामुळे सर्वाधिक बाधा पोचली आहे. 48 तालुक्यापैकी 15 तालुक्यात 25 टक्के, तर 22 तालुक्यात 50 टक्के पाऊस झालाय. लातूर, अहमदपूर, औसा, निलंगा, रेणापूर, उस्मानाबाद,भूम, परांडा, कळंब, नांदेड, देगलूर, हिमायतनगर, गंगाखेड, पठारी, पालम, जिंतूर, पूर्णा, हिंगोली कळमनुरी या तालुक्यात  बाजरी, उडीद, मूग, सोयाबीन या पिक कोमजून गेलीय.

अमरावती विभाग

बुलडाणा वगळता उर्वरित जिल्यात सर्वाधिक भीषण परिस्थिती झालीय.  56 पैकी 42 तालुक्यात फक्त 50 टक्के पाऊस झालाय, यातही सोयाबीन, मूग, उडीद ही पीक शेंगा धरण्याच्या अवस्थेत, तर ज्वारी, मका,  सुकू लागली आहेत. सर्वाधिक फटका मालेगाव, मंगळूरपीर, मनोरा, अमरावती, नांदगाव पेठ, वाणी, या तालुक्यांना बसलाय.

नागपूर विभाग

64 तालुक्यातील 53 तालुक्यात फक्त 50 टक्के पाऊस झालाय. यापैकी 9 तालुक्यात 25 टक्के पाऊस झलाय.  वर्धा, आर्वी, नागपूर, कामठी, रामटेक, उमरेड, भंडारा, तुमसर, लाखांदूर, गोंदिया, देवरी, गोरेगाव, तिरोडा, सलेक्स, मोरगाव, चिमूर,भद्रावती, वरोरा, राजुरा या तालुक्यात भात पीक सुकली, तर अनेक ठिकाणी भाताची लागण होऊ शकली नाही.

या वर्षी राज्यात 134.33 लाख हेक्टर वर म्हणजे 96 टक्के पेरणी झालीय. यापैकी सरासरी क्षेत्राच्या सर्वाधिक 40 टक्के तेलबिया, 30 टक्के तृणधान्य, तर 22 टक्के कडधान्य ची लागवड पाहता पावसाने ओढ दिल्यानं हे उत्पादन घटणार आहे, तर सरासरी क्षेत्रात च्या 41 टक्के कापसाच्या लागवडी खाली आहे. कापसाच्या ऐन फुलोरा लागण्याच्या काळात पावसाने ओढ दिल्याने कापसाचे उत्पादन घटेल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

First published: August 14, 2017, 7:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading