येत्या बुधवारी राज्यातील काही ठिकाणी पुन्हा गारपिटीची शक्यता

येत्या बुधवारी राज्यातील काही ठिकाणी पुन्हा गारपिटीची शक्यता

येत्या बुधवारी मध्य महाराष्ट्रात तर गुरुवारी विदर्भातही गारपीट होण्याची शक्यता केंद्रीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

  • Share this:

05 मार्च : अवकाळी पाऊस आणि गारपीटने शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. पण येत्या बुधवारी राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा गारपीट होण्याची शक्यता आहे.

येत्या बुधवारी मध्य महाराष्ट्रात तर गुरुवारी विदर्भातही गारपीट होण्याची शक्यता केंद्रीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. राज्याच्या इतर भागांत हवा कोरडी राहील. काही आठवडय़ांपूर्वी विदर्भ आणि मराठवाडय़ात गारपिटीमुळे उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झालेच, शिवाय काही शेतकऱ्यांचा बळी गेला होता.

त्यानंतरही अधूनमधून गारपिटीचे इशारे मिळत असल्यामुळे राज्यातील विशाल भूभागातील शेतकरी भयग्रस्त आहेत.  पुढील दोन दिवसही हवेमध्ये फारसा फरक पडणार नाही. मात्र उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने तसंच समुद्रावरून बाष्पयुक्त वारेही येण्याची शक्यता असल्याने बुधवारी मध्य प्रदेश तसेच नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर अशा राज्याच्या उत्तर भागात काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे. गुरुवारी मध्य महाराष्ट्रासोबतच विदर्भातही गारपीट होण्याची शक्यता आहे.

First published: March 5, 2018, 8:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading