नाशिकमध्ये गारपिटीमुळे द्राक्षांचं प्रचंड नुकसान

नाशिकमध्ये गारपिटीमुळे द्राक्षांचं प्रचंड नुकसान

आधीच द्राक्षाला भाव मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत आहे.

  • Share this:

कपिल भास्कर, नाशिक

02 मे : नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं द्राक्षांचं प्रचंड नुकसान झाले आहे. आधीच द्राक्षाला भाव मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत आहे. यातच निसर्गाने घात केल्यानं शेतकरी अडचणीत सापडला आहे.

नाशिक जिल्ह्यातलया ओढा भागातली ही द्राक्षाची बाग. गारपिटीमुळे बागेत द्राक्षांचा हा असा खच पडला आहे. हा खच पाहून शेतकरी हाताश झाला आहे. हातातोंडाशी आलेली द्राक्ष अर्ध्यातासाच्या पावसानं मातीमोल झाली आहेत. हे नुकसान एवढं आहे की यंदा बागेसाठी झालेला खर्चही निघणार नाही. शिवाय पुढच्या वर्षाचं काय करायचं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

प्रशासकीय यंत्रणा पंचनाम्याच्या कामाला लागली असून नुकसान पन्नास ते ऐंशी टक्क्यांपर्यंत असल्याचं सांगण्यात येतंय.

निसर्गानं तर या शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं. आता मायबाप सरकार काय मदत करणार याकडं बागायतदार शेतकरी डोळे लावून बसलेत.

First published: May 2, 2017, 2:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading