Home /News /maharashtra /

बहिणीसोबत मित्राने ठेवले संबंध, भावाने दुचाकीवरच चाकूने सपासप वार करून संपवले, बीड हादरलं

बहिणीसोबत मित्राने ठेवले संबंध, भावाने दुचाकीवरच चाकूने सपासप वार करून संपवले, बीड हादरलं

प्रेम प्रकरणावरून (Love Affair) थरार पाहायला मिळाला आहे. बहिणीसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या मित्राची धावत्या दुचाकीवर अंधारात चाकूने सपासप वार करुन हत्या (Murder in Immoral Relationship)करण्यात आली.

बीड, 23 मे : जिल्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वीच माजलगाव तालुक्यात अनैतिक संबंधातून खून (Murder in Immoral Relationship) झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा अनैतिक संबंधामधून खून झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मित्राने बहिणीसोबत संबंध ठेवल्याची माहिती कळाल्यावर भावाने धावत्या दुचाकीवर मित्राची चाकूने वार करुन हत्या केली. नेमकं काय घडलं? प्रेम प्रकरणावरून (Love Affair) थरार पाहायला मिळाला आहे. बहिणीसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या प्रियकराची धावत्या दुचाकीवर अंधारात चाकूने सपासप वार करुन हत्या (Murder in Immoral Relationship) करण्यात आली. हा थरार रात्री 11 च्या दरम्यान बीडच्या मंझेरी शिवारातील शांतीवन नजीक घडला आहे. तर हत्येनंतर मारेकरी त्याच दुचाकीवरुन पळून गेला होता. मात्र, बीड ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही तासातच, आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मित्राच्या बहिणीसोबत जुळले सूत -  ब्रम्हदेव हनुमान कदम (वय 26 रा. मंझेरी ता. बीड) असे मृताचे नाव आहे. तर लक्ष्मण उर्फ सिद्धेश्वर पांडुरंग बहिरवाळ (रा. मंझेरी, ता. बीड), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मृत ब्रम्हदेव कदम हा अविवाहित असून शेती करायचा. तर आरोपी मित्र लक्ष्मण उर्फ सिद्धेश्वरची बहीण सासरी नांदत नसल्यामुळे माहेरी होती. लक्ष्मण आणि ब्रह्मदेव हे मित्र असल्याने त्यांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. यामुळे लक्ष्मणची बहीण आणि ब्रम्हदेवचे सूत जुळले होते. त्यांच्यातील प्रेमप्रकरणाची भनक लक्ष्मण उर्फ सिद्धेश्वरला लागली होती. (हेही वाचा - Pune Crime News : मैत्रिणीच्या पतीसह त्याच्या मित्रानेही केला तरुणीवर बलात्कार,धमकी देत उकळले पैसे)
दोन्ही हॉटेलमध्ये जेवले आणि नंतर...
या दरम्यान रात्री पालीनजीक असलेल्या एका हॉटेलमध्ये दोघे जेवले. यानंतर मृत ब्रह्मदेव कदम आणि आरोपी लक्ष्मण उर्फ सिद्धेश्वर बहिरवाळ हे दोघे मंजिरी गावाकडे जात होते. यावेळी शांतीवन नजीक आल्यानंतर आरोपी लक्ष्मण उर्फ सिद्धेश्वर याने धावत्या दुचाकीवर ब्रह्मदेव याच्या पोटात चाकूने सपासप वार कडून हत्या केली. त्यानंतर आरोपी लक्ष्मण उर्फ सिद्धेश्वर हा मृत ब्रह्मदेव अशी गाडी घेऊन फरार झाला होता. मात्र, बीड ग्रामीण पोलिसांच्या अथक परिश्रमानंतर अवघ्या काही तासातच आरोपीला बेड्या ठोकण्यात यश आले आहे.
Published by:News18 Desk
First published:

पुढील बातम्या