बुलढाण्यात तब्बल 60 लाखांचा गुटखा जप्त

बुलढाण्यात तब्बल 60 लाखांचा गुटखा जप्त

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथून पोलिसांनी तब्बल 60 लाखांचा गुटखा जप्त केला आहे. त्यामुळे गुटखा बंदी आहे की नाही अशी शंका व्यक्त होतेय.

  • Share this:

बुलढाणा,21 ऑक्टोबर: बुलढाणा जिल्ह्यात गुटखाबंदी अाहे. पण असं असतानादेखील परप्रांतातून अवैध गुटख्याची तस्करी सुरूच आहे.बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथून पोलिसांनी तब्बल 60 लाखांचा गुटखा जप्त केला आहे. त्यामुळे गुटखा बंदी आहे की नाही अशी शंका व्यक्त होतेय.

काही दिवसांपूर्वी  खामगावमध्ये गुटखा जप्तीची मोठी कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता चिखलीमध्ये देखील पोलिसांनी ट्रकसह 60 लाखांचा गुटखा जप्त केला. देऊळगाव राजाकडून चिखलीकडे एका ट्रकमध्ये गुटखा येत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी नाकाबंदी करत सापळा रचून मेहकर फाट्यावर एका ट्रकची तपासणी केली गेली. तर त्यामध्ये तब्बल 80 पोती गुटखा भरलेला होता, त्यावरून पोलिसांनी कारवाई करत संपूर्ण गुटखा ताब्यात घेऊन ट्रक चालक सलीम खान रहमान खान याला ताब्यात घेतलं.

First Published: Oct 21, 2017 08:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading