Home /News /maharashtra /

वडापाव घ्यायला कार थांबवली, दुचाकीवर आलेल्या दोघांनी केला गोळीबार, पंढरपुरातील घटना

वडापाव घ्यायला कार थांबवली, दुचाकीवर आलेल्या दोघांनी केला गोळीबार, पंढरपुरातील घटना

प्रविण सावंत कामाच्या निमित्ताने सांगोला वेळापूर रोडवरून जात होते. वडापाव घेण्यासाठी त्यांनी गाडी थांबवली आणि दुकानात गेले होते.

पंढरपूर, 01 फेब्रुवारी : पंढरपूरमध्ये (pandharpur) दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. वेळापूर सांगोल्यामध्ये एका तरुणावर गोळीबार (gun firing) केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या गोळीबारातून तरुण थोडक्यात बचावला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगोला- वेळापुर रोडवर रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.  प्रवीण शशिकांत सावंत असं या तरुणाचे नाव आहे. सुदैवाने या गोळीबारातून प्रवीण सावंत अगदी थोडक्यात बचावला आहे. प्रविण सावंत कामाच्या निमित्ताने सांगोला वेळापूर रोडवरून जात होते. वडापाव घेण्यासाठी त्यांनी गाडी थांबवली आणि दुकानात गेले होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी सावंत यांच्यावर गोळीबार केला. सावंत यांच्या दिशेनं गोळ्या झाडून हल्लेखोर लगेच फरार झाले. पण, सुदैवाने सावंत यांना गोळी लागली नाही. त्यामुळे अगदी थोडक्यात त्यांचा जीव वाचला. (Smoking सोडण्याचा असाही फायदा! कंगाल तरुणाचं नशीब फळफळलं; आज आहे लखपती) हल्लेखोर बऱ्यााच वेळापासून प्रवीण सावंत यांचा पाठलाग करत होते, नेमकं प्रवीण सावंत यांनी वडापाव घेण्यासाठी गाडी थांबवली असता, हल्लेखोरांनी संधी साधून गोळीबार केला. एक गोळी ही कारवर आदळली आहे. या प्राणघातक हल्ल्यातून सावंत थोडक्यात बचावले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. स्थानिकांनी घटनेची माहिती तातडीने पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे.  वेळापूर पोलीस तपास करीत असून अद्याप गुन्हा नोंद करण्यात आला नाही. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. जुगार अड्ड्याबाहेर दोघांवर कोयत्याने सपासप वार दरम्यान, सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात जुगार अड्ड्यावर दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. जुगार अड्ड्यात झालेल्या वादामुळे एका टोळक्याने कोयत्याने दोघांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील स्टँड परिसरात असणारा एक तीन पानी जुगार अड्डा सध्या जोमात सुरू आहे. या अड्ड्यावर सांगली, मिरजेतील तरुण जुगार खेळण्यासाठी येत असतात. मंगळवारी सांगलीतील एक तरुण आणि मिरजेतील एक तरुण ते दोघे या ठिकाणी जुगार खेळण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांची शहरातीलच काही तरुणांसोबत जोरदार वादावादी झाली. त्यानंतर संबंधित तरुणांनी शहरातील ख्वाजा वसाहत येथील तरुणांना बोलावून दोघांवर कोयता, खुरपे, फायटर याने खुनी हल्ला केला. या टोळक्याने दोघांना बेदम मारहाण केली. त्यामुळे दोघेही घटनास्थळावर रक्तबंबाळ अवस्थेत पडून होते. या भीषण हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. दोन्ही तरुणांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या