'गनमॅन'चा नेम चुकला आणि स्वत:चाच बळी गेला

200 बेकायदा पिस्तूल पकडणारच अशी गर्जनाही केली. पण त्यानं निर्दोष असणाऱ्या राहुल खेत्री याला टार्गेट केलं आणि तो स्वत:च टार्गेट झाला

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 25, 2017 09:55 PM IST

'गनमॅन'चा नेम चुकला आणि स्वत:चाच बळी गेला

वैभव सोनवणे,पुणे  

25 एप्रिल : पुणे पोलीस हे गेले काही दिवस काय करतील याची शाश्वतीच राहिलेली नाही. अनेक वेगवेगळ्या प्रकरणात पुणे पोलिसांचा नाव बदनाम होत असताना आता थेट न्यायालयानेच खोटा आरोपी पकडणाऱ्या पोलीस हवालदारालाच आरोपी म्हणून हजार करण्याचे आदेश दिले आहेत.

हा फोटोत दिसणारा शैलेश जगताप...जगताप हा गुन्हे शाखेत हवालदार आहे. शैलेश जगतापनं आतापर्यंत बेकायदा 161 पिस्तुल पकडले आणि स्वत:ची गनमॅन म्हणून जोरदार जाहिरातबाजी केली. एवढंच नाहीतर आता आपण 200 बेकायदा पिस्तूल पकडणारच अशी गर्जनाही केली. पण त्यानं निर्दोष असणाऱ्या राहुल खेत्री याला टार्गेट केलं आणि तो स्वत:च टार्गेट झाला.

'2 लाख दे नाहीतर तुला बेकायदा शस्त्र बाळगल्याच्या खोट्या गुन्ह्यात अटक करतो' अशी धमकी त्यानं राहुल दिली दिली.

शैलेश जगतापनं पैशासाठी राहुलला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जाळं विणलं खरं पण त्यात तो स्वत:च अडकलाय. न्यायालयाने शहानिशा करून साक्षी पुरावे तपासल्यानंतर शैलेश जगताप याला आरोपी म्हणून हजर करण्याचे आदेश दिलेत.

Loading...

शैलेश जगताप हा पुण्याच्या गुन्हे शाखेत कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत वादातून गोळीबार घडल्याच्या घटनेत ही सहभागी असल्याची दबक्या आवाजात चर्चा असते. आता थेट न्यायालयाने आरोपी म्हणून हजर करायचे आदेश दिल्यानंतरही जर वरिष्ठ अधिकाऱ्यांना गुन्हे शाखेत नेमकं काय सुरू आहे हे कळत नसेल तर मग काय बोलायचं ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 25, 2017 06:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...