मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुसदमध्ये भरदिवसा गोळीबार, डोक्यात गोळी लागल्यामुळे तरुणाचा मृत्यू

पुसदमध्ये भरदिवसा गोळीबार, डोक्यात गोळी लागल्यामुळे तरुणाचा मृत्यू

दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तीनी इम्तियाज खानवर बंदुकीतून गोळ्या झाडल्या.

दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तीनी इम्तियाज खानवर बंदुकीतून गोळ्या झाडल्या.

दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तीनी इम्तियाज खानवर बंदुकीतून गोळ्या झाडल्या.

  • Published by:  sachin Salve

नरेंद्र मते, प्रतिनिधी

पुसद, 25 जुलै : यवतमाळ ( yavatmal) जिल्ह्यातील पुसद (Pusad ) येथे भरदिवसा गोळीबाराची (Firing) घटना घडली आहे. एका तरुणावर दोन अज्ञात व्यक्तीनी गोळीबार केला आहे. या गोळीबारात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुसद-वाशिम रोडवर ही घटना घडली आहे. इम्तियाज खान ( वय 32) असं मृत तरुणाचं नाव आहे. इम्तियाज खान (Imtiaz Khan)  काही कामानिमित्ताने आला होता. नेमकं त्याचवेळी एका दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तीनी इम्तियाज खानवर बंदुकीतून गोळ्या झाडल्या. एक गोळी तरुणाच्या डोक्यात लागली. त्यामुळे तो जागेवरच कोसळला. गोळीबार केल्यानंतर दोघेही हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.

सशस्त्र सीमा बलमध्ये कॉन्स्टेबल पदाच्या 115 जागांसाठी भरती; या लिंकवर करा क्लिक

स्थानिकांनी तातडीने इम्तियाजला स्थानिक मेडिकेआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्या युवकाला मृत घोषित केले.

इम्तियाज हा मेकॅनिकल इंजिनिअर असून तो पुसद येथील अरुण ले आऊट येथे राहतो. मृतकाचा एस आरएसी मोटर वर्क अँड ऑटो गॅरेज आहे. घटनास्थळी पोलीस हजर झाले असून पुढील तपास वसंतनगर पोलिस करीत आहे.

IND vs SL, 1st T20 : भारत-श्रीलंका मॅचचं Live Streaming, कधी, कुठे पाहाल?

तरुणावर गोळीबार कुठल्या कारणासाठी झाला याचा शोध पोलीस घेत आहे. पुसद येथे वरिष्ठ पोलीस अधिकारी आता अधिक तपास करीत आहेत. मृतकावर आर्म ॲक्ट तसंच वन्य जीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल आहे. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्‍वभूमीतून मृतकावर गोळीबार तर झाला नाही ना? याचा सुद्धा तपास पोलीस करत आहे.

First published: