मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

झोपलेल्या भावंडांवर घरात घुसून झाडल्या गोळ्या; धक्कादायक घटनेनं जळगाव हादरलं!

झोपलेल्या भावंडांवर घरात घुसून झाडल्या गोळ्या; धक्कादायक घटनेनं जळगाव हादरलं!

(File Photo)

(File Photo)

Gun Firing in Jalgaon: जळगाव शहरातील कांचननगर याठिकाणी आज सकाळी साढे आठच्या सुमारास गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Published by:  News18 Desk
जळगाव, 23 सप्टेंबर: जळगाव शहरातील कांचननगर याठिकाणी आज सकाळी साढे आठच्या सुमारास गोळीबार (Gun firing in Jalgaon) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रिक्षातून आलेल्या हल्लेखोरांनी झोपेत असणाऱ्या भावंडांवर गावठी बंदुकीतून गोळीबार (Gun firing at 2 brothers) केला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण एका भावाच्या हाताला गोळी लागल्याने जखमी झाला आहे. भरदिवसा झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आकाश सपकाळे आणि सागर सपकाळे असं हल्ला झालेल्या दोघा भावंडाची नावं असून दोघंही जळगाव शहरातील कांचननगर परिसरात वास्तव्याला आहेत. दरम्यान आज सकाळी साढे आठच्या सुमारास रिक्षातून आलेल्या 4 ते 5 हल्लेखोरांनी घरात घुसून आकाश आणि सागरवर गोळीबार केला आहे. अचानक घरात शिरलेल्या आरोपींनी आकाश आणि सागर यांची अंगावरील चादर ओढून त्यांच्यावर गावठी बंदुकीतून चार ते पाच गोळ्या झाडल्या आहेत. पण यावेळी हल्लेखोरांसोबत झटापट झाल्यानं दोघे भाऊ थोडक्यात बचावले आहेत. हेही वाचा-'मानसिक आजार दूर करण्यासाठी SEX करावं लागेल', YOUTUBE डॉक्टरकडून अजब उपचार या झटापटीत आकाशच्या हाताला एक गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे. याशिवाय झालेल्या झटापटीत एक हल्लेखोर खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तो घटनास्थळीच पडून होता. या धक्कादायक घटनेनंतर हल्लेखोरांना रिक्षातून पोबारा केला आहे. हेही वाचा-पुणे: सायबर कॅफेत जाताना तरुणीसोबत घडलं विपरीत; रेल्वे रुळावर आढळला मृतदेह या घटनेत हल्लेखोरांनी 4 ते 5 राऊंड फायर केल्याची माहिती प्रथमदर्शीनी समोर आली आहे. घरात आणि आजूबाजूला काही काडतुसे पडली होती. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळी गावठी बंदुक टाकून पळ काढला आहे. हा हल्ला नेमका कुणी केला? आणि कोणत्या कारणातून केला? याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. पण हा हल्ला पूर्ववैमनस्यातून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
First published:

Tags: Crime news, Jalgaon

पुढील बातम्या