मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'40 रेडे गुवाहाटीला जाणार, पण मी नाही कारण...', गुलाबराव पाटलांची तुफान टोलेबाजी

'40 रेडे गुवाहाटीला जाणार, पण मी नाही कारण...', गुलाबराव पाटलांची तुफान टोलेबाजी

गुलाबराव पाटील

गुलाबराव पाटील

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील सर्व मंत्री व आमदार हे कामाख्या देवीच्या दर्शनासाठी पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत. मात्र मंत्री गुलाबराव पाटील यावेळी शिंदे गटासोबत नसरणारेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ajay Deshpande

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील सर्व मंत्री व आमदार हे कामाख्या देवीच्या दर्शनासाठी पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत. मात्र मंत्री गुलाबराव पाटील हे शिंदे गटासोबत गुवाहाटीला जाणार नाहीयेत. जिल्हा दूध संघाची निवडणूक असल्याने आपण गुवाहाटीला जाणार नसल्याचं गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान त्यांनी यावेळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना देखील उपरोधिक टोला लगावला आहे. पहिल्यांदा जेव्हा आमदार गुवाहाटीला गेले होते तेव्हा संजय राऊत यांनी 50 रेड्यांचा देवीला बळी देणार असं म्हटलं होतं. यावरून टोला लगावताना कामाख्या देवीला 40 रेडे जाणार असल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील? 

जिल्हा दूध संघाची निवडणूक आहे, त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. निवडणुकीमुळे मला गुवाहाटीला जाता येणार नाही. मी जरी जाणार नसलो तरी आमचे बाकीचे सर्व आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला जाणार आहेत. शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेणार असल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :  संजय राऊतांना मोठा दिलासा, ईडीच्या आव्हान याचिकेबाबत मोठी अपडेट समोर

मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया 

मुख्यमंत्री शिंदे गटाच्या सर्व आमदारांना घेऊन कामख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहेत. यावर  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.  आम्ही 50 लोक गुवाहाटीला जाणार आहोत. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलावले आहे. आम्ही तिथे जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहोत. देवीचे आर्शीवाद घेणार आहोत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच आम्ही कोणतंही काम लपून, छपून करत नाही तर उघड करतो असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी विरोधकांना देखील टोला लगावला आहे.

First published:

Tags: Eknath Shinde, Gulabrao patil