मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'शिवतिर्थावर दसरा मेळावा घ्या पण...', गुलाबराव पाटलांनी ठाकरेंना डिवचलं

'शिवतिर्थावर दसरा मेळावा घ्या पण...', गुलाबराव पाटलांनी ठाकरेंना डिवचलं

शिवाजी पार्क मैदानात शिवसेनेचा दसरा मेळावा घ्यायला उद्धव ठाकरे यांना मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे, यावरून शिवसेना नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरेंना डिवचलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalgaon, India
  • Published by:  Shreyas

जळगाव, 25 सप्टेंबर : शिवाजी पार्क मैदानात शिवसेनेचा दसरा मेळावा घ्यायला उद्धव ठाकरे यांना मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे, यावरून शिवसेना नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरेंना डिवचलं आहे. 'शिवतिर्थावर दसरा मेळावा घेण्यासाटी ठाकरे गटाला न्यायालयाने परवानगी दिली आहे. हा निर्णय सर्वांनी मान्य केलाच पाहिजे, यात ठाकरे गटाने पहिली लढाई जिंकली, असं होत नाही. तीन तासांची सभा, त्यात कोणती लढाई,' असं मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

'आम्हीदेखील बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्याची तयारी सुरू केली आहे. आता नेमकं कोणाकडे जास्त लोक येतात याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे,' असं गुलाबराव पाटील म्हणाले.

शिवतिर्थावर त्यांची सभा होत आहे ही चांगली गोष्ट आहे. सभा झालीच पाहिजे, पण त्या सभेत सोनिया गांधी आणि शरद पवारांचे विचार मांडू नका, असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

शिंदे गट सुप्रीम कोर्टात?

दसरा मेळाव्याचा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागल्यानंतर आता शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाणार का? याबाबतचा सस्पेन्स कायम आहे. दसरा मेळाव्यासाठी सुप्रीम कोर्टात जाण्याची शिवसैनिकांची इच्छा आहे, पण याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.

'कोर्टाने दिलेल्या निकालाचं यांना पालन करता येत नाही. काल निकाल लागल्यानंतर कशा पद्धतीने जल्लोष केला, हे सगळ्यांनी पाहिले. कायदा आणि सुव्यवस्था राखावी, असं कोर्टाने सांगितलं होतं, पण काल कसं चिडवण्यात आलं, हे पाहिलं. आम्ही कुणाला चिडवणार नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं सोनं लूटणार आहोत,' अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली.

First published: