मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

...तर माझा करेक्ट कार्यक्रम झाला असता; गुलाबराव पाटलांनी सांगितला 'तो' प्रसंग

...तर माझा करेक्ट कार्यक्रम झाला असता; गुलाबराव पाटलांनी सांगितला 'तो' प्रसंग

जळगावमध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजळा दिला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalgaon, India
  • Published by:  Ajay Deshpande

जळगाव, 19  नोव्हेंबर :  जळगावमध्ये एका कार्यक्रमात बोतल असताना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजळा दिला आहे. साधं सरपंचपद कोणी सोडत नाही, मात्र आम्ही 8 जणांनी मंत्रिपद सोडलं . आम्ही आयुष्याचा सट्टा खेळून भाजपाकडे आलो. आम्ही मंत्रिपद तर सोडलं होतं. मात्र जर आमची संख्या पूर्ण झाली नसती तर आम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली होती असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी आम्हाला 38 आमदारांची गरज होती. मी  33 वा होतो आणखी जर पाच आले नसते तर माझा कार्यक्रम आटोपला असता असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हटलं गुलाबराव पाटील यांनी? 

गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा तो प्रसंग सांगितला आहे. लोक साधं सरपचंपद सोडत नाहीत. मात्र आम्ही मंत्रिपद सोडलं. सत्ता स्थापण करण्यासाठी आम्हाला 38 आमदारांची गरज होती. मी  33 वा होतो आणखी जर पाच आले नसते तर माझा कार्यक्रम आटोपला असता. मात्र असं मरण्यापेक्षा शहीद झालो तरी चालेल अशी खूणगाठच डोक्यात बांधून आम्ही बाहेर पडलो होतो, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा :  'त्याची किंमत मला मोजावी लागली', शरद पवारांनी 'त्या' आठवणींना दिला उजाळा

संजय राऊतांवर निशाणा  

दरम्यान पुढे बोलताना गुलाबराव पाटील यांनी म्हटलं की, एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेल्यानंतर 22 आमदारांसह मी उद्धव ठाकरे यांना सांगायला गेलो होतो. मात्र त्यावेळी त्यांच्या आजूबाजूचे जे लोक होते त्यांनी आम्हाला "दिखते हो शेर जैसे लगते हो चुहे जैसे" असं म्हणून डिवचलं, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी अप्रत्यक्षपणे संजय राऊत यांना टोला लगावला आहे. मात्र आम्ही त्यावेळी ठरवलचं होतं, असं मरण्यापेक्षा शहीद झालो तरी चालेल अशी खूनगाठ डोक्यात बांधत आम्ही बाहेर पडल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: BJP, Eknath Shinde, Gulabrao patil, Sanjay raut, Uddhav Thackeray