'हॉटेल नाही पण परमिट रुम चालते', गुलाबराव पाटलांचा बेरोजगार तरुणांना अजब सल्ला

'हॉटेल नाही पण परमिट रुम चालते', गुलाबराव पाटलांचा बेरोजगार तरुणांना अजब सल्ला

जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचं बेरोजगारांना मार्गदर्शन करताना वादग्रस्त विधान

  • Share this:

जळगाव, 14 फेब्रुवारी : विद्यार्थीदशेत असताना पैसे मिळवण्यासाठी काहीतरी व्यवसाय करायचा मनात ठरवलं होतं. त्या प्रमाणे शाकहारी हॉटेल सुरू केलं. त्यावेळी ते चालायचं नाही. मग नंतर मांसाहारी पदार्थ सुरू केले तर हॉटेलमध्ये ग्राहक येण्यास सुरुवात झाली. पण त्यामध्ये अपेक्षित तेवढा नफा मिळत नव्हता. त्यानंतर हॉटेलसाठी परवानगी घेऊन परमिट रुम सुरू केली तर हॉटेल चालायला लागलं. ज्या हॉटेलचा दिवसभराचा गल्ला 4 हजार होता त्य़ाचा परमिट रुमनंतर 20 हजारपर्यंत गेला. दिवसेंदिवस याचं प्रमाण वाढत गेलं. शाहकारी हॉटेल चालत नाही पण परमिट रुम चालते असा दावा करत त्यांनी बेरोजगार आणि नव्या व्यवसायात उतरु पाहणाऱ्या तरुणांना अजब सल्ला दिला आहे. गुलाबराव पाटील यांनी जळगावात गुरुवारी प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेच्या मेळाव्यात हा अजब सल्ला दिला आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत विविध शासकीय योजनांच्या संदर्भात जिल्हास्तरीय मेळाव्याचं उद्घाटन गुरुवारी गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. त्यावेळी तरुणांना मार्गदर्शन करत असताना त्यांनी हा अजब सल्ला दिला.

हेही वाचा-भीषण अपघात! मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलावरून खाली कोसळली कार

यावेळी त्यांनी तरुणांसोबत आपले व्यवसायातील अनुभव शेअर केले. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दारूच्या दुकानाबाबतही समर्थन केलं आहे. एकानं सांगितलं दारूचं दुकानं टाक त्यानं व्यवसाय दुप्पट होईल. आपण राजकारणात आहोत तर हा दारूचा व्यवसाय कसा करायचा असा प्रश्न मनात आला त्यावेळी पण मी नाही तर दुसरा कोणीतरी करणारच मग आपण का सुरू करू नये असा विचार आला. त्यानंतर मी सुरू केला आज 60 ते 70 हजार रुपये मिळायला लागले. म्हणजे व्यवसाय करण्याची आवड पाहिजे आणि तो मनापासून करता आला पाहिजे. असा त्यांनी स्वत:चा व्यवसायातील अनुभव तरुणांना सांगून अजब सल्ला देत मार्गदर्शन केलं आहे.

हेही वाचा-पुलवाम्यातील शहिदांचे कुटुंब वाऱ्यावरचं, सरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस

First published: February 14, 2020, 9:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading