मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'उद्धव ठाकरेंसोबत 35 वर्षे राहिलो, पण ..'; शिंदेंच्या नातवावरील वक्तव्यामुळे गुलाबराव पाटील नाराज

'उद्धव ठाकरेंसोबत 35 वर्षे राहिलो, पण ..'; शिंदेंच्या नातवावरील वक्तव्यामुळे गुलाबराव पाटील नाराज

फाईल फोटो

फाईल फोटो

'मी उद्धव ठाकरेंच्या 35 वर्षे जवळ राहिलो आहे, पण त्यांना कधीही बोलताना घसरलेलं पाहिलं नाही. दीड वर्षांच्या मुलावर ते टीका करतात, राजकारणाची पातळी इतक्या खाली जाऊ नये'

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kiran Pharate

नितीन नंदुरकर, प्रतिनिधी 

जळगाव 07 ऑक्टोबर : शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा नेहमीपेक्षा वेगळा होता. कारण यावेळी शिवतीर्थ आणि बीकेसी मैदान अशा दोन ठिकाणी शिंदे आणि ठाकरे अशा दोन गटांचे मेळावे पाहायला मिळाले. या मेळाव्यांनंतर कोणी किती गर्दी जमवली यावरुन आता राजकीय चर्चा सुरू आहेत. आता पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

दोन मेळावे असले तरी आमच्या मेळाव्यात आम्हाला अपेक्षित असलेल्या गर्दीपेक्षा जास्त गर्दी आली. हिंदुत्वाचा विचार आणि शिवसेनेसाठी एकनाथ शिंदे यांनी घेतलेला पवित्रा लोकांना मान्य असल्यानेच आम्हाला ही पावती मिळाली, असा दावा गुलाबराव पाटील यांनी यावेळी बोलताना केला.

दुखावलेल्या बापाचं पत्र! मुलावरची टीका जिव्हारी, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीसोबत जाण्याबाबतच्या निर्णयावरही त्यांनी यावेळी पुन्हा एकदा टीका केला. 'शिवसेना महाविकास आघाडीत सहभागी झाली त्यावर आमचं काहीच म्हणणं नव्हतं. झालं ते झालं, पण ज्यावेळी आम्ही सांगत होतो हवामानाचे अंदाज बदलत होते, सोसाट्याचा वारा येणार होता, पाऊस पडणार होता, तरीही आपण निर्णय बदलला नाही', असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.

राजकीय क्षेत्रात सार्वभौम निर्णय घेणारी पार्टी चालेल. एकतर्फी निर्णय घेणारी पार्टी चालणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. ते म्हणाले की आमच्याकडे खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे कायद्यानुसार धनुष्यबाण आम्हालाच मिळायला हवा.

आव्वाज कुणाचा? शिंदेंचा की ठाकरेंचा? दसरा मेळाव्याला ध्वनी प्रदूषणाचा अहवाल काय सांगतो पाहा

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातवाबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता उमटायला सुरूवात झाली आहे. यावरही गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की 'मी उद्धव ठाकरेंच्या 35 वर्षे जवळ राहिलो आहे, पण त्यांना कधीही बोलताना घसरलेलं पाहिलं नाही. दीड वर्षांच्या मुलावर ते टीका करतात, राजकारणाची पातळी इतक्या खाली जाऊ नये', असं म्हणत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

काय कमी दिलं त्यांना? बाप मंत्री आता तर मुख्यमंत्री आहे, कार्टं खासदार. पुन्हा डोळे लावून बसले आहेत, नातू नगरसेवक. अरे त्याला मोठं तर होऊ दे, शाळेत जाऊ दे. आताच नगरसेवक? असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं होतं.

First published:

Tags: Gulabrao patil, Uddhav Thackeray