Home /News /maharashtra /

Gulabrao Patil Shiv sena : आयत्या बिळावर नागोबावाला मी नाही गुलाबराव पाटलांचा मुख्यमंत्र्यावर रोख

Gulabrao Patil Shiv sena : आयत्या बिळावर नागोबावाला मी नाही गुलाबराव पाटलांचा मुख्यमंत्र्यावर रोख

काल सदा सरवणकर तर आज गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि राऊतांना sanjay raut) जुन्या आठवणी सांगत त्यांच्यावर टीका केली आहे.

  मुंबई, 29 जून : मागच्या आठवड्यापासून महाराष्ट्रात (Maharashtra politics) राजकीय घडामोडी घडत असल्याने राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिले आहे. बंडखोर आमदारांचा (shiv sena mla in guwahati) मागच्या काही दिवसांपासून खासदार संजय राऊत (shiv sena mp sanjay raut) खरपूस समाचार घेत आहेत. यावर बंडखोर आमदारांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. काल सदा सरवणकर तर आज गुलाबराव पाटील (gulabrao patil)  यांनी उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि राऊतांना sanjay (raut) जुन्या आठवणी सांगत त्यांच्यावर टीका केली आहे.

  एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील यांच्यासह 40 आमदारांनी बंडखोरी केली आहे. यावरून संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. यामुळे बंडखोर आमदार आणि संजय राऊत यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. गुवाहाटीतून निघतानाच्या शेवटच्या मिटींग वेळी गुलाबराव पाटील यांचा व्हिडीओ समोर आला आहे यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांसह संजय राऊतांचा समाचार घेतला आहे. 

  हे ही वाचा : राज्यपालांचे आदेश राफेलपेक्षा जास्त वेगाने, त्यांच्यावरही कदाचित दबाव असेल; संजय राऊतांचा टोला

  ते म्हणाले कि, ज्यावेळेस मैदान येईल त्यावेळी आम्ही त्यांना काफी आहोत हे सिद्ध करून दाखवू, मुख्यमंत्र्यांनी वर्षा सोडली मातोश्रीवर गेले, आमच्यासारख्या 52 आमदारांना सोडलं पण त्यांनी आमच्यासाठी शरद पवारांना सोडलं नाही. आम्ही त्यांच्यासाठी काय केलं नाही त्यांनी सांगावे. आमची परिस्थीती नव्हती आम्ही घरावर तुळशीपत्र ठेवून शिवसेनेसाठी लढा दिला आहे. आम्हाला त्यांच्या आशिर्वादाने मिळाले परंतु आमचाही त्यात काहीतरी वाटा आहे. हे त्यांनी विसरू नये, आम्ही आयत्या बिळावर नागोबा आम्ही नाही. अशा भाषेत गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला.

  यानंतर गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला, ते म्हणाले मी टपरीवाला आहे त्यांना माहिती नाही चुना कसा लावतात हे त्यांना माहिती नाही जेव्हा वेळ येईल त्यावेळी त्यांना मी सांगेन चुना कसा लावायचा असतो. अशी टीका संजय राऊतांवर गुलाबराव पाटील यांनी केली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे गट गुवाहाटीमधून निघण्याची शक्यता आहे.

  हे ही वाचा : महाविकास आघाडीत 'ऑल इज वेल' नाही! शिवसेनेमुळे वाढली घटकपक्षांची धाकधूक

  राज्यपाल कोश्यारींचे मुख्यमंत्र्यांना पत्र

  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी आज सकाळीच महाविकास आघाडीला पत्र पाठवले आहे. पण महाराष्ट्र सरकार आणि उपाध्यक्षांचे वकील सर्वोच्च न्यायालयात बहुमत चाचणीच्या विरोधात तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी ३० जून रोजी होणाऱ्या बहुमत चाचणीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Eknath Shinde, Gulabrao patil, Sanjay Raut (Politician), Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)

  पुढील बातम्या