मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

दोन ठिकाणी प्रतिशिवसेना भवन उभारणार, गुलाबराव पाटलांनी बोलून दाखवलं

दोन ठिकाणी प्रतिशिवसेना भवन उभारणार, गुलाबराव पाटलांनी बोलून दाखवलं

व्यक्ती जर चांगला आणि समाजाला घेऊन चालणारा असला तर त्या माणसाला कुठेच अडचण येत नाही.

व्यक्ती जर चांगला आणि समाजाला घेऊन चालणारा असला तर त्या माणसाला कुठेच अडचण येत नाही.

व्यक्ती जर चांगला आणि समाजाला घेऊन चालणारा असला तर त्या माणसाला कुठेच अडचण येत नाही.

  • Published by:  sachin Salve
मुक्ताईनगर, 14 ऑगस्ट : शिवसेनेतून बाहेर पडलेला शिंदे गट आता पक्षाच्या चिन्हापाठोपाठ शिवसेनाभवनावरही (Shiv Sena bhavan) डोळा ठेऊन आहे. मुंबईत प्रतिशिवसेना भवन उभारले जाणार आहे. 'शिवसेना भवन लवकरच दादर आणि ठाण्यामध्ये उभारण्यात येणार आहे प्रत्येकाच्या असलेल्या समस्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणात शिवसेना भवन लवकरच उभे राहणार आहे, अशी माहिती शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी दिली आहे. मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर गुलाबराव पाटील हे जळगावात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना पाटील यांनी शिवसेना भवन उभारण्याबद्दल स्पष्टपणे सांगितलं. 'मी पक्षाला मानणारा कार्यकर्ता आहे पण, पक्षापेक्षा व्यक्तीलाही मानणारे यात लोक असतात तर काही लोक व्यक्तीला बघूनही मतदान देत असतात पण व्यक्ती जर चांगला आणि समाजाला घेऊन चालणारा असला तर त्या माणसाला कुठेच अडचण येत नाही. यामुळेच माणसाने माणसासारखा असला पाहिजे त्या ठिकाणी पक्ष आडवा येता कामा नये जर तुम्ही असे असाल तर निश्चितच तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही, असा कानमंत्रच पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला. (मुख्यमंत्र्यांचा सर्व आमदारांसाठी मोठा निर्णय, ठाकरेंचा थेट मोदींवर हल्ला) 'पक्षाच्या व्यतिरिक्त ही सर्व धर्माचे लोक माझ्यावर प्रेम करतात हे आज या रॅलीच्या माध्यमातून दिसून आला यामुळेच राजकारणाची खरी श्रीमंती आणि आशीर्वाद ही जनताच असते. मी पक्षाला देवच मानतो यामुळे देवांमध्ये कोणीही वाटेचे पाडू नये हेच माझं मत आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो नसलो तरी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करत आहोत, असंही पाटील म्हणाले. 'आमच्या दोन्ही पक्षात कुठलीही नाराजी नसून प्रत्येकालाच असं वाटतं की मला चांगलं खाता मिळाला पाहिजे आणि त्याला तो हक्क ही आहे, असंही पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं. (दैनंदिन राशीभविष्य: रविवारचा दिवस या राशींसाठी असेल खास; कोणाला होणार लाभ?) 'शिवसेना भवन लवकरच दादर आणि ठाण्यामध्ये उभारण्यात येणार आहे. प्रत्येकाच्या असलेल्या समस्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणात शिवसेना भवन लवकरच उभे राहणार आहे, असंही पाटील यांनी सांगितलं. 'आधी आम्ही एकाच आघाडीमध्ये होतो, आता आम्ही वेगळे जरी झालो तरीही आम्ही तू तू मै मै करणार नाही काही गरज पडली तर नाथाभाऊंचे मार्गदर्शन घेऊ, असंही पाटील म्हणाले.
First published:

पुढील बातम्या