आता तरी जमिनीवर या, किरीट सोमय्यांना सेनेला टोला

आता तरी जमिनीवर या, किरीट सोमय्यांना सेनेला टोला

गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचा पराभव व्हावा असं शिवसेनाला वाटत होतं

  • Share this:

18 डिसेंबर : गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचा पराभव व्हावा असं शिवसेनाला वाटत होतं पण आता तरी जमिनीवर या असा टोला भाजपचे खासदार किरीट सोमय्यांनी सेनेला लगावला.

गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवलाय. गुजरातमध्ये भाजपने बहुमत मिळवलं तर हिमाचलमध्ये काँग्रेसला पराभूत करत भाजपने सत्तेवर कब्जा केलाय. भाजपचे खासदार किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर तोंडसुख घेत टोला लगावला. " गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचा पराभव व्हावा असं दिवा स्वप्न  आमचे मित्र उद्धव ठाकरे आणि शिवसेना पाहत होती. पण आता तरी यांना जाग येणार का ?, सेना  जमिनीवर येणार अशी प्रार्थना मी देवाकडे करतो असा टोला सोमय्यांनी लगावला.

First published: December 18, 2017, 2:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading