मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गुजरातमधून महाराष्ट्रात येताच व्यापाऱ्याची हत्या, छातीवर वार करून 4 जणांनी संपवलं

गुजरातमधून महाराष्ट्रात येताच व्यापाऱ्याची हत्या, छातीवर वार करून 4 जणांनी संपवलं

प्रकाश भाई जसवंत भाई पटेल यांची हत्या करणारे हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

प्रकाश भाई जसवंत भाई पटेल यांची हत्या करणारे हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

प्रकाश भाई जसवंत भाई पटेल यांची हत्या करणारे हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

  • Published by:  Akshay Shitole

सचिन जिरे, औरंगाबाद, 31 जानेवारी : गुजरातमधील व्यापारी प्रकाश भाई जसवंत भाई पटेल यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी औरंगाबादेमधील नगारखानागल्ली भागात घडली आहे. दुचाकीवरून तोंडाला रुमाल बांधून आलेल्या तीन हल्लेखोरांनी त्यांच्या खोलीत जाऊन चाकूने भोसकून दिवसा-ढवळ्या हत्या केली.

प्रकाश भाई जसवंत भाई पटेल यांची हत्या करणारे हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद झाले असून पोलीस त्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. हा हल्ला हवालाच्या आर्थिक देवाणघेवाण वरून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मूळचे गुजरात राज्यातील व्यापारी प्रकाश भाई पटेल यांनी औरंगाबादेतील नगारखाना गल्ली भागात एक कार्यालय आहे. कार्यालयाच्या बाजूलाच त्यांचे घर आहे आणि काही अंतरावर एक अजून तीन खोलीचा फ्लॅट आहे. याच फ्लॅट मध्ये सर्व रोखीचे व्यवहार होत असे.

पटेल हे आज सकाळीच गुजरात येथून औरंगाबादेत आले. त्यानंतर दुपारी ते त्यांच्या फ्लॅट मध्ये दोन मित्रांसह बसलेले असताना अचानक एक हल्लेखोर त्यांच्या फ्लॅटमध्ये आला आणि त्याने पटेल यांच्यावर पिस्तूल रोखली.हे पाहून पटेल यांचे दोन्ही मित्र फ्लॅटमधील बाथरूममध्ये लपले. त्यानंतर पटेल हे बाहेर पळून जात असतानाच बाहेर उभ्या इतर दोघांनी त्यांना चाकूने भोसकले.

हातावरची मेहंदी उतरण्याआधीच मृत्यूने गाठलं, नवविवाहितेला हौस पडली महागात

रक्तबंबाळ अवस्थेत पटेल हे शेजारील त्यांच्या कार्यालयात गेले. तेथेच त्यांचा मृत्यू झाला. पटेल यांच्यावर बंदूक रोखल्याची सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. ते डिव्हीआर पोलिसांनी जप्त केले आहे. या घटनेची माहिती मिळताच सिटीचौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली असता त्यामध्ये तीन तरुण हल्लेखोर हे तोंडाला रुमाल बांधून मोटारसायकल वरून आले असल्याचे स्पष्ट झाले. तिन्ही हल्लेखोर सीसीटीव्ह मध्ये कैद झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी जेव्हा पटेल यांच्या फ्लॅटची झडती घेतली तेव्हा तिथं नोटा मोजण्याची मोठी मशीन, त्याचबरोबर नोटांच्या बंडलला लावण्यात येणारी चिकटपट्टी, स्टेपलर असे एखाद्या बँकेत असणारे साहित्य मागील खोलीत आढळून आले. यावरून या ठिकाणी मोठ्या रक्कमेची मोजणी होत असल्याचा संशय आहे. हा हल्ला हवाला रॅकेटशी संबंधित असल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. या हत्येप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

First published:

Tags: Aaurangabad, Aurangabad crime