गुज्जर गॅंगचा म्होरक्या अटकेत, पाकिस्तानात पळून जाण्याचा त्याचा होता इरादा

बीड शहरातील सैनिकी विद्यालयाचे शिक्षक सय्यद साजेद अली यांच्या हत्येप्रकरणात फरार असलेल्या कुख्यात गुंड गुज्जर खानच्या अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

News18 Lokmat | Updated On: Oct 9, 2019 02:40 PM IST

गुज्जर गॅंगचा म्होरक्या अटकेत, पाकिस्तानात पळून जाण्याचा त्याचा होता इरादा

सुरेश जाधव(प्रतिनिधी),

बीड,9 ऑक्टोबर: बीड शहरातील सैनिकी विद्यालयाचे शिक्षक सय्यद साजेद अली यांच्या हत्येप्रकरणात फरार असलेल्या कुख्यात गुंड गुज्जर खानच्या अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. बीड पोलिस दलातील दरोडा प्रतिबंधक पथकाने तब्बल 4 राज्यात गुज्जरचा पाठलाग केला. तो पाकिस्तानला पळून जाण्याच्या तयारी असताना त्याला अटक करण्यात आले.

सय्यद साजेद अली यांच्या हत्या प्रकरणासह गुज्जर खानवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. तर गुज्जर खानवर तब्बल 26 गुन्हे दाखल असून त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई देखील प्रस्तावित आहे. तब्बल 4 दिवसांच्या अथक पाठलाग आणि 4 हजार किलोमीटरच्या प्रवासानंतर दरोडा प्रतिबंधक पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव आणि त्यांच्या पथकाने गुज्जरच्या अटकेची कारवाई केली, अशी महिती बीडचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

सैनिकी महाविद्यालयाचे शिक्षक सय्यद साजेद यांची 19 सप्टेंबर रोजी बीड शहरात दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. कुख्यात गुंड गुज्जर खानने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ही हत्या केल्याचा आरोप आहे. यापूर्वीही गुज्जर खानने बीड शहराच्या बालपीर परिसरात एका व्यापाऱ्याला खंडणी मागून पेट्रोल टाकून त्यांचे घर जाळण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. हत्येच्या घटनेनंतर या खंडणी प्रकरणात देखील मोक्का लावण्याचा निर्णय बीडच्या पोलीस अधीक्षकांनी घेतला होता. मात्र, 19 सप्टेंबरपासून गुज्जर खान फरार होता. त्याच्या अटकेसाठी पोलिसांची विविध पथके जंग जंग पछाडत होती. स्वतः पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधिक्षक विजय कबाडे हे परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते. स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक हे सगळेच गुज्जर आणि त्याच्या साथिदारांच्या मागावर होते.

अखेर दरोडा प्रतिबंधक पथकाने तब्बल चार राज्यात त्याचा पाठलाग केला. देशात वेगवेगळ्या ठिकाणी फिरलेल्या गुज्जरला अखेर बीडलाच यावे लागले. दरोडा प्रतिबंधक पथकाला त्याच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. गुज्जरकडून एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. गुज्जर आणि त्याचे सहकारी हे कुख्यात गुंड असून बालेपीर परिसरात त्यांची दहशत आहे.

Loading...

हैद्राबादमधून गुज्जर थेट अजमेरला गेला, तेथून तो माऊंट अबु आणि कच्छला गेला. तेथून त्याचा पाकिस्तानात होण्याचा इरादा होता. मात्र त्याला 'लिंक' मिळाली नाही, त्यामुळे तो म्हैसाना (गुजरात) येथे आला. तेथून भांडू येथे त्याने काही सेकंदासाठी सिमकार्ड मोबाइलमध्ये टाकले. दरोडा प्रतिबंधक पथकाला त्याची भनक लागली, तेथून तो थेट पुण्यात आला. पुण्याच्या विमाननगर भागात तो वास्तव्याला होता. मात्र, पोलीस मागावर असल्याने तो बीडला आला. मागावरच असलेली पथकाने अखेर त्याला बीडमध्ये गाठले. त्याच्या मुसक्या आवळल्या. या संपूर्ण प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांची कामगिरी महत्त्वाची ठरली. त्यांना प्रत्येक पथकाने, स्थानिक गुन्हा शाखेने आणा ट्रँकींग टीमने मदत केली असल्याचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितले.

आईच्या कुशीतून 8 महिन्यांच्या बाळाला पळवलं, धक्कादायक CCTV VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 9, 2019 02:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...