मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महाराष्ट्राच्या भूगोलाला गुजरातची पाने? राष्ट्रवादीचा हल्लाबोल

महाराष्ट्राच्या भूगोलाला गुजरातची पाने? राष्ट्रवादीचा हल्लाबोल

महाराष्ट्र शासनाच्या भुगोलाच्या पुस्तकात गुजराती भाषेतील काही पानं आढळून आल्यानं एकच खळबळ उडालीय. विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत विधानपरिषद डोक्यावर घेतली.

नागपूर, ता. 13 जुलै : महाराष्ट्र शासनाच्या भूगोलाच्या पुस्तकात गुजराती भाषेतील काही पानं आढळून आल्यानं एकच खळबळ उडालीय. विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत विधानपरिषद डोक्यावर घेतली. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी सभागृह सरकारला जाब विचारला. मात्र सरकारनं छापलेल्या पुस्तकात गुजराती छापण्यात आलेली नसल्याचा दावा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलाय. तर माझ्या आरोपात काही चूकीचं आढळून आलं तर मी सभागृहातच विष पिऊन आत्महत्या करेनं असं प्रत्युत्तर सुनिल तटकरे यांनी दिलंय.

राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी सुनील तटकरे यांनी सभागृहात भुगोलाचं पुस्तकच दाखवून त्यात गुजराती पानं असल्याचं सांगितलं. रोहा तालुक्यातल्या काही शाळांमध्ये भुगोलाच्या पुस्तकात गुजराती साहित्यिकांची माहिती असणारी पानं असल्याचा दावाही त्यांनी केला. सरकारनं तातडीनं यावर स्पष्टीकरण द्यावं अशी मागणीही तटकरे यांनी केली.

महाराष्ट्र सरकार हे गुजरातला कायम झुकतं माप देत असल्याचा आरोप विरोधी पक्ष वारंवार करत असतो. तर सरकार त्याचा इन्कार करते. महाराष्ट्राच्या वाट्याचं पानी गुजरातने पळवल्याचा या आधी आरोप झाला होता. काही पुस्तकांमध्ये गुजराती पानं असणं आणि काही पुस्तकांमध्ये अशी पानं नसणं यामुळे घोळ वाढला असून सरकारनं लवकरात लवकर वस्तुस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

हेही वाचा...

शिर्डीत साईबाबांची प्रतिमा भिंतीवर उमटल्याचा लोकांचा दावा, VIDEO व्हायरल

VIDEO : मॉक ड्रिल करताना ट्रेनरने दुसऱ्या मजल्यावरून दिला धक्का, विद्यार्थिनीचा मृत्यू

गणेशोत्सवात थर्माकॉलच्या मखरावरची बंदी कायम

मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार

First published:

Tags: Geography, Gujarati language, Maharashtra, Sunil tatkare, Text book, गुजराती, भुगोल, महाराष्ट्र, सुनील तटकरे