मृत्यू कुठेही गाठू शकतो! 55 वर्षीय व्यक्तीने एका क्षणात गमावला जीव

मृत्यू कुठेही गाठू शकतो! 55 वर्षीय व्यक्तीने एका क्षणात गमावला जीव

रविवारी (ता. 20) वसंत कानसे प्रशांत दीक्षित यांच्या घरी रंगकामासाठी गेले होते.

  • Share this:

गुहागर, 21 सप्टेंबर : चिखली बौध्दवाडीत पोफळीवरील सुपारी काढताना लोखंडी पाईप वीजवाहिनीला चिकटला. त्यामुळे वीजेच्या धक्क्याने वसंत लक्ष्मण कानसे (वय 55) रा. चिखली मांडवकरवाडी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची खबर संजय कृष्णा कानसे यांनी गुहागर पोलीस ठाण्यात दिली आहे.

पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, चिखली मांडवकर वाडी येते रहाणारे वसंत लक्ष्मण कानसे रंगकाम करतात. चिखली बौध्दवाडी प्रशांत दीक्षित यांच्या घराचे नुतनीकरणाचे काम सुरू आहे. रविवारी (ता. 20) वसंत कानसे प्रशांत दीक्षित यांच्या घरी रंगकामासाठी गेले होते.

दुपारी 1 वाजताच्या दरम्यान ते लघुशंकेसाठी घराशेजारील बागेत गेले. तेथे लावलेल्या पोफळीवर त्यांना सुपारी दिसली. ती सुपारी काढण्यासाठी घराशेजारीच पडलेला लोखंडी पाईप त्यांनी घेतला. त्याला तेथीलच लोखंडी हुक लावला आणि पोफळीवरील सुपारी काढण्याचा प्रयत्न वसंत कानसे करत होते.

मात्र या बागेतून गेलेली विद्युत वाहिनी त्यांना दिसली नाही. दुर्दैवाने सुपारी काढताना पाईपला अडकवलेल्या हुकाचा स्पर्श वीज वाहिनीला झाला. विजेच्या धक्क्याने वसंत कानसे यांचा जागीच मृत्यू झाला.  सदर घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल हनुमंत नलावडे करत आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे आयुष्यात माणसाला कधी आणि कुठे मृत्यू गाठेल, याचा अंदाज बांधणं कठीण असल्याचा प्रत्यय आला आहे. त्यामुळे कोणतंही काम करताना सावधगिरी बाळगण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: September 21, 2020, 7:43 PM IST
Tags: ratnagiri

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading