मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पाहुणी म्हणून आलेल्या भावजयीनं नणंदेच्या दागिन्यांवर मारला डल्ला; शौचकुपात लपवलं सोनं, असा झाला भांडाफोड

पाहुणी म्हणून आलेल्या भावजयीनं नणंदेच्या दागिन्यांवर मारला डल्ला; शौचकुपात लपवलं सोनं, असा झाला भांडाफोड

Crime in Jalgaon: जळगाव जिल्ह्यातील अमळनेर याठिकाणी एका भावजयीनं आपल्या नणंदेचे दागिने चोरल्याची घटना उघडकीस आली आहे.

Crime in Jalgaon: जळगाव जिल्ह्यातील अमळनेर याठिकाणी एका भावजयीनं आपल्या नणंदेचे दागिने चोरल्याची घटना उघडकीस आली आहे.

Crime in Jalgaon: जळगाव जिल्ह्यातील अमळनेर याठिकाणी एका भावजयीनं आपल्या नणंदेचे दागिने चोरल्याची घटना उघडकीस आली आहे.

    अमळनेर, 08 जानेवारी: जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील अमळनेर याठिकाणी एका भावजयीनं आपल्या नणंदेचे दागिने चोरल्याची (Theft ornaments) घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे भावजयीनं चोरलेले दागिने शौचकुपात लपवून (Hide ornaments in toilet) ठेवले होते. चोरटा कोणीतरी घरातीलच असावा, असा संशय कुटुंबीयांना होता. पण पोलिसांना बोलावलं तर समाजात आपलीच बदनामी होईल यामुळे संबंधित कुटुंबीयांनी पोलिसांत जाण्याचं टाळलं. पण विचित्र पद्धतीने चोरीचं प्रकरण उघडकीस आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी भावजय मुंबईला राहते. ती पाहुणी म्हणून जळगावातील अमळनेर येथे आली होती. याठिकाणी आल्यानंतर तिने आपल्या नणंदेच्या दागिन्यांवर डल्ला मारला. झडती घेतली तर आपण लगेच सापडू या भीतीने आरोपी भावजयीने चोरलेले दागिने शौचकुपात लपवले. दागिने चोरीला गेल्याचं निदर्शनास आल्यानंतर, घरच्यांनी स्वत:च्या मुलांसह सर्वांची झडती घेतली. पण सोनं काही सापडलं नाही. चोर परिवारातीलच असावा, असं संशय कुटुंबीयातील सदस्यांना होता. हेही वाचा-एकतर्फी प्रेमातून पुण्यातील डॉक्टरने हद्द केली पार; कांड वाचून बसेल धक्का त्यामुळे हे प्रकरण पोलीस ठाण्यात जायचं टाळण्यात आलं. पण पाहुणी म्हणून आलेल्या भावजयीला, शालक आणि मुलांना दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघायचं होतं. पण भावजयीचा घरातून पाय निघत नव्हता, कोणत्या ना कोणत्या कारणातून त्या निघायचं नाव घेत नव्हत्या. दरम्यान ज्या महिलेचे दागिने चोरीला गेले होते, त्या महिलेचा  भाऊ लघुशंकेसाठी गेला. यावेळी त्यांचा मोबाइल शौचकुपात पडला. आपला मोबाइल काढत असताना, त्यांना मोबाइलसोबत मंगळपोतच हाती लागली. हेही वाचा-नाशकातील जंगलात 10 वर्षीय मुलीसोबत सुरू होता भयंकर प्रकार; ऐनवेळी गुराखी आला अन् चोरीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर, घरातील काही सदस्यांनी आता पोलिसांना बोलवाच असा हट्ट धरला. त्यानंतर घाबरलेल्या भावजयीनं आपली चूक कबूल केली आहे. पाहुणी म्हणून आलेल्या भावजयीनेच हा प्रताप केल्याचं समजात कुटुंबीयांना धक्का बसला. पण आरोपी महिला कुटुंबीयांतील असल्यानं या प्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आलेली नाही.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Jalgaon

    पुढील बातम्या