मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Gudi Padwa 2022: राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले, यंदा निर्बंधमुक्त साजरा होणार गुढीपाडवा

Gudi Padwa 2022: राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले, यंदा निर्बंधमुक्त साजरा होणार गुढीपाडवा

Gudi Padwa: राज्यात यंदा गुढी पाडवा साजरा करण्यावर कुठलेही निर्बंध नाहीत. राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.

Gudi Padwa: राज्यात यंदा गुढी पाडवा साजरा करण्यावर कुठलेही निर्बंध नाहीत. राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.

Gudi Padwa: राज्यात यंदा गुढी पाडवा साजरा करण्यावर कुठलेही निर्बंध नाहीत. राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई, 31 मार्च : राज्यात यंदा गुढीपाडवा (Gudi Padwa) सण मोठ्या उत्साहात, आनंदात तसेच शोभायात्रा काढून साजरा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाकरे सरकारने (Maharashtra Government) गुढीपाडवा साजरा करण्यावर कुठलेही निर्बंध नसल्याचं जाहीर केलं आहे. आज मंत्रीमंडळात कोरोना चे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले आहेत. गुढी पाडव्याच्या मिरवणूक काढण्यात येणार आहेत. मुस्लीम बांधवांना रमजान उत्साहात साजरा करता येणार आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यात सण-उत्सव साजरे करण्यावर निर्बंध होते. पण आता कोरोना आटोक्यात आला असून राज्य कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे हे निर्बंध मागे हटवण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर आज राज्य मंत्रिमंडळाने आगामी काळात येणारे सण-उत्सव साजरे करण्यावर कुठलेही निर्बंध नसल्याचं जाहीर केलं आहे.

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे. आंबेडकर जयंतीला मिरवणुका काढता येणार आहेत. तसेच रमजानही उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मास्क वापरणं ऐच्छिक

सर्व निर्बंध हटवण्यात आले असून त्यात मास्क मुक्तीचाही निर्णय घेण्यात आला असल्याचं बोललं जात आहे. मास्क वापरणं हे ऐच्छिक असणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक अद्याप सुरू आहे. या बैठकीनंतर राज्य सरकारकडून अधिकृतपणे पत्रक काढण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे निर्बंध उद्यापासून हटवण्यात येणार आहेत. उद्यापासून हे निर्बंध हटवण्यात आल्याने 2 एप्रिल 2022 रोजी येणारा गुढीपाडवा यंदा उत्साहात, आनंदात तसेच शोभायात्रा काढून साजरा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आता आटोक्यात आला आहे. त्यामुळे निर्बंधांत आणखी शिथिलता आणण्यात यावी आणि सण-उत्सवांवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध लावण्यात येऊ नयेत अशी मागणी जोर धरत होती. 2 एप्रिल रोजी गुढीपाडवा सण असून मराठी नववर्षानिमित्त सर्वत्र प्रचारसभा, मिरवणूक, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. त्यामुळे या कार्यक्रमांवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध लादू नयेत अशी मागणी होत होती.

First published:

Tags: Coronavirus, Gudi padwa, Maharashtra News