इम्तियाज अली, प्रतिनिधी
भुसावळ, 15 ऑगस्ट : 'भुसावळातील (Bhusawal) काही प्रवृत्ती अशा आहेत ज्या मुख्याधिकार्यांनाही त्रास देत आहेत. कुणी स्वतःला डाकू समजत असतील तर त्यांची गय केली जाणार नाही शिवाय आमच्या नादी त्यांनी लागू नये, त्यांचे सर्व रेकॉर्ड खिशात असून नादी लागाल तर त्याचा अंदाज बांधू शकत नाही. अजूनपर्यंत पालकमंत्री काय आहे ते दाखवलेले नाही व ज्या दिवशी दाखवेल त्या दिवशी हे लोक शहरातही दिसणार नाहीत', अशा शब्दांत सेनेचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी कडक इशारा दिली आहे.
नगरसेवक पिंटू ठाकूर यांच्या प्रभागात विविध विकासकामांचे लोकार्पण त्यांच्याहस्ते झाले. यावेळी भुसावळमध्ये गुन्हेगारीची प्रकरणं वाढली आहे. यामुद्यावर बोलत असताना गुलाबराव पाटलांनी हा इशारा दिला.
दरीत कोसळत होती कार...; भारतीय सैन्य दलाने चालकाचा वाचवला जीव, VIDEO VIRAL
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, भुसावळ शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून 18 वर्षांच्या मुलाच्या हातात कट्टा आला आहे. ही बाब गंभीर असून या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक लावली असून त्यांच्याशी या विषयावर मी चर्चा करणार आहे. शहरातील गुन्हेगारी अजिबात खपवून घेतली जाणार नाही. पोलीस उपअधीक्षकांनाही मी गुन्हेगारांना हद्दपार करण्यासंदर्भात चर्चा केली असल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले.
धक्कादायक! गोसेखुर्द धरणाच्या कालव्यात दोन तरुणांचा बुडून मृत्यू
'भुसावळातील काही प्रवृत्ती अशा आहेत ज्या मुख्याधिकार्यांनाही त्रास देत आहेत. कुणी स्वतःला डाकू समजत असतील तर त्यांची गय केली जाणार नाही शिवाय आमच्या नादी त्यांनी लागू नये, त्यांचे सर्व रेकॉर्ड खिशात असून नादी लागाल तर त्याचा अंदाज बांधू शकत नाही. अजूनपर्यंत पालकमंत्री काय आहे ते दाखवलेले नाही व ज्या दिवशी दाखवेल त्या दिवशी हे लोक शहरातही दिसणार नाहीत' असा सज्जड दमच पाटलांनी गुन्हेगारांना भरला.
तसंच, 'आमदार संजय सावकारे यांचा कुणालाही त्रास नाही, त्यांचे काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्र्यांनी काढले.
गुलाबराव पाटलांनी गायलं देशभक्ती गीत
दरम्यान, भाषणादरम्यान अचानक गुलाबराव पाटील यांच्या भावना जागृत झाल्या आणि माईक हातात घेऊन चक्क 'ए वतन मेरे लिये हैं' देशभक्तीपर गीत संगीताच्या तालावरती गायले आणि उपस्थित असणाऱ्या सर्वांची मने पाटील यांनी जिंकली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gulabrao patil, Jalgaon, गुलाबराव पाटील, भुसावळ