Home /News /maharashtra /

मुंबईत तैनात होती SRPFची तुकडी, 175 जवानांच्या संपूर्ण ग्रुपला केलं क्वारंटाईन

मुंबईत तैनात होती SRPFची तुकडी, 175 जवानांच्या संपूर्ण ग्रुपला केलं क्वारंटाईन

SRPF जवानांची एक तुकडी मुंबई येथील घाटकोपर रमाई नगर या ठिकाणी फिक्स पॉईंटवर बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली होती.

सुमित सोनवणे (प्रतिनिधी) दौंड, 17 एप्रिल: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दौंडमधील राज्य राखीव पोलिस बल (SRPF) गट क्रमांक 7 चे 175 पोलिस जवानाचा ग्रुप क्वारंटाईन करण्यात आला आहे. सर्व जवानांना एका मंगल कार्यालयाच्या हॉलमध्ये ठेवण्यात आलं आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, SRPF जवानांची एक तुकडी मुंबई येथील घाटकोपर रमाई नगर या ठिकाणी फिक्स पॉईंटवर बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली होती. नेहमीप्रमाणे तीन महिन्यांचा बंदोबस्त पूर्ण करून ही तुकडी परतली. मात्र, आमदार राहुल कुल यांच्या सुचनेनंतर जवानांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. आता आणखी 14 दिवस या जवानांना आपल्या कुटुंबापासून वेगळं राहावं लागणार आहे. हेही वाचा.. कोरोनाचा एकही रुग्ण नाही या गावात! लोक म्हणतात, या 'ममी'ची कृपा! 85 जवानांची एक तुकडी मुंबईमधील घाटकोपर या ठिकाणी होती तर दुसरी 90 जवानांची तुकडी अहमदनगर या ठिकाणी तीन महिन्यांसाठी स्थित होती. बंदोबस्त पूर्ण झाल्यानंतर त्यांना आमदारांच्या सुचनेनंतर या सगळ्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. सर्व SRPF चे जवान रस्त्यावर स्वतः उतरून लोकांना काळजी घेण्याचे आवाहन करत असतात. तसेच स्वतःही नियम पाळताना दिसतात. बंदोबस्तासाठी तीन महिने घराबाहेर राहून सुद्धा आणखी 14 दिवस घरापासून दूर राहण्याची वेळ या कोरोनामुळे या जवानांवर आली आहे. हेही वाचा..ऊसतोड मजुरांचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा, धनंजय मुंडेंनी केलं ट्वीट दौंड नगरपालिकेच्या वतीने दौंडचे मुख्यधिकारी मंगेश शिंदे यांनी देखील SRPFच्या जवानांची आणि जागेची पाहणी करून योग्य ती खबरदारी घ्यावी, आशा सूचना केल्या आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने पुण्यापासून 70 किलोमीटर आणि बारामतीपासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या दौंड तालुक्यामध्ये एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही. याचे कारण आमदार, सर्व अधिकारी यांनी ताबडतोब घेतलेल्या निर्णयामुळे शक्य झाल्याची चर्चा सुरु आहे. संपादन- संदीप पारोळेकर

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Corona, Coronavirus, Srpf jawan firing

पुढील बातम्या