'बंबई से गई पूना, पूना से गई पटना', तरीही घर येईना! मजुरांच्या प्रवासाचा वेदनादायी GROUND REPORT

'बंबई से गई पूना, पूना से गई पटना', तरीही घर येईना! मजुरांच्या प्रवासाचा वेदनादायी GROUND REPORT

लॉकडाउनमध्ये अडकलेल्या परप्रांतीयांना त्यांच्या मुळगावी सोडण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून श्रमिक रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु, या श्रमिक रेल्वेचा प्रवास परप्रांतीयांसाठी वेदनादायी ठरत आहे.

  • Share this:

 मुंबई, 24 मे :  लॉकडाउनमध्ये अडकलेल्या परप्रांतीयांना त्यांच्या मुळगावी सोडण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून श्रमिक रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु, या श्रमिक रेल्वेचा प्रवास परप्रांतीयांसाठी वेदनादायी ठरत आहे. मुंबईतून निघालेली रेल्वे जळगावमध्ये तब्बल 12 तास रखडली होती. त्यामुळे परप्रांतीय तरुणांचे अतोनात हाल झाले.

'तौकीर गुरुवारी भलताच खुशीत होता.  कारण, त्याला आज त्याच्या घरी जायला मिळणार होतं. याच आनंदात त्याने बॅग भरली, आपल्या भाड्याचं घर सोडलं आणि येऊन पोहोचला सीएसएमटी स्थानकात. गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता गाडी सुटताच त्याच्या आनंदाला पारावर नाही उरला. त्याला वाटलं, आता लगेच आपण शनिवारी दुपारचं जेवणच घरी घेऊ. त्याचा हा आनंद भुसावळपर्यंत टिकला.  कारण, भुसावळमध्ये थांबलेली गाडी आता पुढे सरकेल, नंतर पुढे सरकेल या विचारात असतानाच जवळपास 12 ते 13 तासांचा कालावधी उलटला.  त्यानंतर रेल्वे हळूहळू पुढे सरकायला लागली. पण हे बारा तास नुसते काळजीचे नव्हते तर तहानलेले आणि भुकेलेले होते. ट्रॅकवर थांबलेल्या रेल्वेमध्ये ना जेवणाचा पुरवठा होत होता ना पाण्याचा. त्यामुळे आपल्याकडे उरलेल्या बिस्किटे आणि पाण्यावर कसेबसे ते 12 तास तौकीरसह इतर स्थलांतरीत मजुरांनी काढले. तौकीरला आता शनिवारऐवजी घरी पोहोचायला रविवार रात्र होणार आहे. जवळपास 36 तासांचा उशीर रेल्वेला होणार आहे.

तौकीर सारखीच व्यथा अशा हजारो मजुरांची आहे जे उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल या दिशेनं राज्यभरातून  निघाले आहेत. अनेक गाड्यांचे मार्गही बदललेले आहेत. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या मते, 'ज्या गाड्या भुसावळहून जाणार होत्या त्या आता नागपूर मार्गे फिरवल्या गेल्यात आणि याचे एकमेव कारण म्हणजे, ज्या दोन मध्य रेल्वे झोनमधून या गाड्या जाणार आहेत. त्याची  इतकी क्षमता नाही की मोठ्या प्रमाणामध्ये गाड्यांचा संचलन करतील'.

हेही वाचा -कोरोनाच्या संकटात किम जोंग रचत आहेत खतरनाक प्लॅन, बैठक घेऊन जगाला दिला इशारा

उत्तर मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी यांच्या मते 'दुपटीपेक्षा अधिक मोठ्या संख्येने ते गाड्या चालवत आहे. जेव्हा गाडी त्यांच्या झोनमध्ये येते त्या गाडीला परत फिरण्यासाठी  त्या गाडीचे इंजिन पुढे आणून लावावे लागते. मग गाडी आलेल्या राज्याच्या दिशेने परतते आणि याच्यात बराच वेळ जातो. उत्तर मध्य रेल्वेहुन गाड्या व्यवस्थित पुढे जाव्यात यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तासंतास  कंट्रोल रूम थांबावं लागत आहे.  नुसते वरिष्ठ अधिकारीच नाही तर स्वतः  उत्तर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक या काळात कंट्रोल रूममध्ये बसून प्लॅनिंग करत आहे.

उत्तर मध्य रेल्वे दिलेल्या आकडेवारीनुसार, बिना- झांसी- कानपूर या मार्गावर बारा ते पंधरा गाड्या चालवण्याची क्षमता असतानाही उत्तर मध्य रेल्वे 30 श्रमिक गाड्या दिवसाला चालवते. उत्तर मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेल्या  प्रयगराज ते गोरखपूर या मार्गावर खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये एकाच वेळेला अनेक गाड्या राज्यभरातून आल्याने या रेल्वे झोनमध्ये खूप मोठा गाड्यांची गर्दी झाली आहे. ज्यामुळे एकतर मार्ग बदलावे लागतात किंवा खूप गोल फिरून वेगळा मार्गाने गाडी आणावी लागते. अन्यथा एकाच ठिकाणी बारा ते पंधरा तास गाडी थांबवली जाते.

हेही वाचा -अखेरचा प्रवासही वेदनादायी, अन्न-पाण्यावाचून मजूर तरुणाचा असा झाला शेवट!

स्थलांतरीत मजुरांना घरी तर पोहोचायचं आहे. पण या प्रवासात त्यांचे हाल होत आहे. त्यांना अन्नपाण्याविना राहावे लागत आहे, त्यासाठी रेल्वेनं काळजी घेणे गरजेचे आहे. कारण रेल्वे स्टेशनला गेल्याशिवाय अन्न आणि पाणी गाडीत पोहोचवलं जातं नाही. त्यामुळे जर एखादी गाडी एका ट्रॅकवर खूप तास थांबणार असेल तर किमान काही अन्नपुरवठा त्यांच्याकडे होईल का? याची काळजी घेणे सध्या गरजेचं आहे.

लॉकडाउनच्या  दोन महिन्यांच्या कालावधीत जे मिळेल ते अन्न खाऊन राहिलेली ही मंडळी आता आपली घरी परतते खरी पण त्यांच्याकडे ना खिशात पैसा आहे. ना हाताला काम आहे. त्यामुळे आधीच मानसिक तणावाखाली असलेल्या या स्थलांतरीत मजुरांचा प्रश्‍न बिकट होत चालला आहे.

First published: May 24, 2020, 12:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading