GROUND REPORT : कोरोनावर उपचार करताना कोल्हापुरात आढळला धक्कादायक प्रकार

GROUND REPORT : कोरोनावर उपचार करताना कोल्हापुरात आढळला धक्कादायक प्रकार

याच रुग्णालयात काम करणाऱ्या तिनशेहून अधिक डॉक्टर ब्रदर्स नर्स आणि वॉर्डबॉय यांच्या जीवाशी खेळ कोण करतंय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 19 एप्रिल : संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत आहे. देशातले सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या रूग्णालयांमध्ये सध्या कोरोनाशी झुंज द्यायला मोठ्या प्रमाणात आर्थिक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पण, हाच निधी नेमका जातोय कुठे असा सवाल उपस्थित होतोय. त्याचं कारण आहे कोल्हापूर मधल्या सीपीआर रुग्णालयातील पीपीई कीटची अवस्था..

कोल्हापूर जिल्ह्यात सध्या कोरोनाचे सात रुग्ण आहेत त्यापैकी दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर तीन रुग्णांवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण, याच रुग्णालयात काम करणाऱ्या तिनशेहून अधिक डॉक्टर ब्रदर्स नर्स आणि वॉर्डबॉय यांच्या जीवाशी खेळ कोण करतंय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण, फाटक्या किटवर या सगळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांकडून कोरोणाशी लढा दिला जात आहे.

हेही वाचा - उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदावरून भाजपच्या माजी खासदाराचा राज्यपालांवर निशाणा

ही पीपीई कीट निकृष्ट दर्जाची असल्यामुळे एक ते दीड तासातच फाटत असल्याची माहिती काही कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर न्यूज 18 लोकमतला दिली आहे. त्यामुळे ही कीट नेमकी कुठून खरेदी करण्यात आली, निधी देऊनही कीट निकृष्ट दर्जाची का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. याबाबत राज्य सरकार आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

कोल्हापूर शहराचा विचार करता महापालिकेकडून आतापर्यंत 34 हजार लोकांचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे, त्यामुळे सीपीआर रुग्णालय महत्त्वाचं आहे. याच रुग्णालयातील दूधगंगा ही पाच मजली इमारत सध्या कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. यावर मात करण्यासाठी विविध वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये सुरक्षा कवच म्हणून पीपीई कीटची आवश्यकता असते पण ही कीट अगदी ट्रान्सफर असून  थोडी जरी हालचाल केली तरी ही कीट फाटत आहेत. त्यामुळे ही किट्स नेमकी कशासाठी आणि कुणाच्या फायद्यासाठी मागवण्यात आली, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा - Coronavirus चा धोका : डायबेटिज रुग्णांनो 'या' गोष्टी जरूर लक्षात ठेवा

3 दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनाही क्वारंटाइन करण्यात आलं होतं. सुदैवाने त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले असले तरी या सगळ्या बाबतीत जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

 

संपादन - सचिन साळवे

First published: April 19, 2020, 1:27 PM IST
Tags: kolhapur

ताज्या बातम्या