डॉक्टरांचा अतिउत्साहीपणा नडला, उजनी बॅकवॉटर दुर्घटनेचा गाऊंड रिपोर्ट

डॉक्टरांचा अतिउत्साहीपणा नडला, उजनी बॅकवॉटर दुर्घटनेचा गाऊंड रिपोर्ट

उजनीच्या त्या पाण्यात सूर्य तांबुस होत चालेला. डॉक्टर आपली सुट्टी मस्त चालल्याचा आनंद घेत होते. आणि नेमकं त्याच वेळेस बोटीला अपघात झाला. बोट चालकासह 11 जण बोटीत होते. त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला.

  • Share this:

1 मे : महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला उजनीच्या बॅक वॉटरमध्ये मोठा अपघात घडलाय. यात 4 डॉक्टरांना जीव गमवावा लागलाय तर 6 डॉक्टर्सना वाचवण्यात यश आलंय. पण पाणी कमी आहे म्हणून जर तुम्ही मोठ्या धरणात उतरणार असाल तर सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेऊनच निर्णय घ्या..

संपूर्ण महाराष्ट्र ज्यावेळेस महाराष्ट्र दिन साजरा करण्याची जय्यत तयारी करत होता, नेमकं त्याचवेळेस महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या उजनीच्या बॅक वॉटरमध्ये एक शोकांतिका घडत होती. उनं उतरायला लागली त्यावेळेस रविवारची सुट्टी साजरी करायला 10 डॉक्टर मित्र अजोती गावात आले. समोर क्षितीजापर्यंत पसरलेलं पाणी पाहून ह्या 10 डॉक्टर मित्रांना बोट घेऊन पाण्यात जाण्याचा मोह आवरला नाही. योगायोग असा की, तिथंच काही मच्छिमारी करणाऱ्या पेट्रोल बोटीही होत्या. सगळ्या डॉक्टरांनी त्यातल्या एका बोटवाल्याला पटवलं आणि बोट घेऊन उजनीच्या त्या शांत पण अफाट शक्ती असलेल्या पाण्यात घुसले.

आता उजनीच्या त्या पाण्यात सूर्य तांबुस होत चालेला. डॉक्टर आपली सुट्टी मस्त चालल्याचा आनंद घेत होते. आणि नेमकं त्याच वेळेस बोटीला अपघात झाला. बोट चालकासह 11 जण बोटीत होते. त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला. त्या चौघांचेही मृतदेह सापडायला जवळपास 12 तासापेक्षा जास्त काळ लागला. पण प्रश्न असाय की अपघात कसा घडला आणि बोट बुडाली कशी?

बोट कशी बुडाली?

............................

थिअरी क्रमांक-1

.................................

पोहायला येणाऱ्या डॉक्टरांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही.

पोहण्यासाठी पाण्यात उतरले पण चढताना सगळे जण एकाच बाजुला आले, त्यात बोट कलंडली आणि न पोहता येणारे डॉक्टरही पाण्यात पडले, बुडाले.

थिअरी क्रमांक-2

सगळ्याच डॉक्टरांनी पोहण्यासाठी पटापट पाण्यात उड्या मारल्या,

बोट कलंडली, नंतर त्यांना पाण्यामुळं चढताच आलं नाही, भीती

वाढली तसे बुडत गेले

थिअरी क्रमांक-3

बोटीची क्षमता 6 जणांची होती पण प्रत्यक्षात बोटीत 11 जण बसले.

जशीही बोट थोडीशी खोल पाण्यात गेली तशी हेलकावे घ्यायला

लागली. बसलेले सगळे जण घाबरले. हालचाल करायला लागले

तशी बोट उलटी झाली. त्यात बुडाले.

पाच वाजता बोट बुडीची शोकांतिका सुरू झाली. बोटवाल्यानं आरडाओरड केला त्यावेळेस आजुबाजूचे मच्छिमारही मदतीला धावले. सहा जणांना वाचवण्यात यश आलं. सात वाजताच्या आसपास अंधार पडला त्यावेळेस लक्षात आलं की चार जण बुडालेले आहेत आणि त्यांचा पत्ता नाही. स्थानिकांनी शोध घेतला तर काल रात्री पहिला मृतदेह सापडला आणि दुपारपर्यंत राहीलेले तीन.

उन्हाळा कडक आहे. पाणी दिसलं तर मोह पडू शकतो. मग कोयनेचं पाणी असो की उजनीचं की, आणखी एखाद्या लहान धरणाचं. पण लाईफ जॅकेट आणि पुरेशी सुरक्षेचे उपाय केल्याशिवाय धाडस करू नका. कारण अपघात टाळता येतो.

First published: May 1, 2017, 8:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading