Home /News /maharashtra /

Ground Report: रक्षा की उन्मेष..? ही लोकसभा निवडणूक ठरवेल जळगावचा भविष्याचा नेता

Ground Report: रक्षा की उन्मेष..? ही लोकसभा निवडणूक ठरवेल जळगावचा भविष्याचा नेता

जिल्ह्यात एकनाथ खडसे यांच वर्चस्व राहीलं आहे. सतीश पाटील, सुरेश जैन, मनीष जैन यांचा अपवाद वगळला तर खडसेंना जिल्हाभर विरोध करण्याची हिंमत कुणी दाखवली नाही. मंत्रिपदावरुन पायउतार झाल्यानंतर मात्र गिरीश महाजन यांनी खडसेंचा गडाला अक्षरशः सुरुंग लावले.

पुढे वाचा ...
    प्रफुल्ल साळुंखे, (विशेष प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव लोकसभा मतदार संघाची निवडणूक होतेय. ही निवडणूक फक्त उमेदवार निवडण्यासाठी होणार नाही. जळगाव जिल्ह्याचा भावी नेता कोण?  हेही ठरवणारी आहे, हे निश्चित. जिल्ह्यात एकनाथ खडसे यांच वर्चस्व राहीलं आहे. सतीश पाटील, सुरेश जैन, मनीष जैन यांचा अपवाद वगळला तर खडसेंना जिल्हाभर विरोध करण्याची हिंमत कुणी दाखवली नाही. मंत्रिपदावरुन पायउतार झाल्यानंतर मात्र गिरीश महाजन यांनी खडसेंचा गडाला अक्षरशः सुरुंग लावले. महापालिका, जिल्हा परिषद, विधान परिषद या निवडणुकीत भाजपला न भूतो असं यश मिळवून दिलं. आता लोकसभेच्या निमित्ताने पुन्हा दोन्ही नेते रिंगणात आहेत. रावेरचा गड खडसेंना राखायचा आहे तर गिरीश महाजन यांनी आपाल्या उमेदवारसाठी प्रतिष्ठा पणाला लावलीय. खडसे-महाजन यांची ही निवडणूक वाटत असली तरी खरी लढाई भविष्यात जिल्ह्यावर कोण सत्ता गाजवले याची आहे. रक्षा खडसे आणि उन्मेष पाटील यांच्यामधून जिल्ह्याचा नेता कोण होईल? या वर्चस्वाची सुरवात आहे.  रक्षा खडसे अत्यंत आक्रमक नेत्या आहेत,  कामाचा सपाटा, अभ्यास, मतदार संघावर पकड, गतीमान हालचाली हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. उन्मेष पाटील यांची राजकीय महत्त्वाकांक्षा , ती साध्य करण्यासाठी टोकाला जायची तयारी, भविष्याचा अभ्यास आणि पेरणी हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. खडसे- महाजन नेते असतानाही  उन्मेष पाटील यांनी आमदार असतानाही  तीन वर्षांत जिल्ह्यात स्वतःची नवी टीम निर्माण केली. पुढच्या पाच वर्षांत एकनाथ खडसे यांची राजकीय गतिमानता किती असेल? ती जागा निश्चित रक्षा खडसे भरुन काढतील. रक्षा खडसे यांना जिल्ह्यातील खडसे निष्ठावंतचा मोठा पाठिंबा आपसूकच मिळेल. ती त्यांची जमेची बाजू असेल. भविष्यात सत्ता असेल नसेल तरी देखील गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वासमोर एक-एक आव्हान उभं राहील. की केलं जाईल?  हे वास्तव आहे. हीच संधी उन्मेष पाटील यांच्या पथ्यावर पडेल. तोपर्यंत आगामी 5 सहा वर्षांत जिल्ह्यात उन्मेष पाटील यांची नवी टीम उदयाला आलेली असेल.  दोन्ही खासदारची जळगाववर वर्चस्व निर्माणची लढाई असेल. भविष्यात मुक्ताईनगरमधून खडसे यांच्या वारसदारकडे मतदार संघ सोपवून रक्षा खडसे जळगाववर लक्ष केंद्रित करतील. तर चाळीसगाव मतदार संघ आपल्या भविष्यासाठी पत्नी संपदा पाटील यांच्याकडे सोपवून उन्मेष पाटील जळगाव शहरात ठाण मांडतील. येथेच जिल्ह्यावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी रक्षा खडसे उन्मेष पाटील यांच्यात संघर्ष उभा राहील. जिल्ह्यात सतीश पाटील यांच नेतृत्त्व उभं राहू शकलं असतं. पण अत्यंत प्रखर विरोधक आणि पक्षांतर्गत साथ न मिळाल्याने सतीश पाटील यांची घोडदौड रोखली गेली. खडसे विरोधात गुलाबराव पाटील यांच नेतृत्व उभं राहिलं. पण जिल्ह्यत वर्चस्व मिळवण्यात त्यांना मर्यादा आहेत आणि मर्यादा आल्यात हे सत्य आहे. अमळनेर शिरीष चौधरी, किशोर पाटील आणि भुसावळ संजय सावकारे याचं मतदार संघ सोडून जिल्हयात किती हस्तक्षेप करतील आणि प्रभावी ठरतील, हे काळ ठरवेल.  गुलाबराव देवकर यांच नेतृत्त्व मान्य करण्यास कोण पुढाकार घेईल हा प्रश्न आहे. जिल्ह्यातील विकास कामात मोठा हस्तक्षेप, ती मिळवण्यासाठी जीवघेणा संघर्ष, आणि वर्चस्व मिळवण्यासाठी चुकीच्या लोकांना दिलेलं बळ याला कंटाळून जिल्ह्यात तिसरं नेतृत्त्व जनताच अचानक उभं करेल. त्याला काही काळ जावा लागेल. आज निवडणुकीत जे चित्र उभे राहीलं आहे, त्यावरचा हा अंदाज आहे. राजकारणात क्षणाक्षणाला मित्र आणि शत्रू बदलतात. पण सध्या ज्या राजकीय सारीपाटवर सोंगट्या फिरताना दिसतंय त्यावरुन भविष्यात जळगाव  जिल्ह्यावर वर्चस्व कुणाचं हे हीच लोकसभा निवडणूक ठरवेल, हे मात्र नक्की.
    First published:

    Tags: Election 2019, Girish mahajan, Raksha khadse

    पुढील बातम्या