चारा टंचाईमुळे पशुधन धोक्यात..मरणावस्थेत पोहोचलेल्या गायींना टरबूज खाऊ घालून वाचविण्याचा प्रयत्न

एकीकडे राज्यात चाऱ्याची टंचाई नसल्याचा दावा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील करत असताना दुसरीकडे मात्र नाशिक जिल्ह्यात अनेक भागात भीषण चारा टंचाई निर्माण झाल्याने पशुधन धोक्यात आले आहे.

News18 Lokmat | Updated On: May 18, 2019 07:51 PM IST

चारा टंचाईमुळे पशुधन धोक्यात..मरणावस्थेत पोहोचलेल्या गायींना टरबूज खाऊ घालून वाचविण्याचा प्रयत्न

बब्बू शेख, (प्रतिनिधी)

मनमाड, 18 मे- एकीकडे राज्यात चाऱ्याची टंचाई नसल्याचा दावा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील करत असताना दुसरीकडे मात्र नाशिक जिल्ह्यात अनेक भागात भीषण चारा टंचाई निर्माण झाल्याने पशुधन धोक्यात आले आहे. आता चारा टंचाईचा फटका थेट गोशाळेतील पशुधनला बसला आहे. चारा मिळत नसल्यामुळे मरणाअवस्थेत पोहोचलेल्या गायींना टरबूज-खरबूज खाऊ घालून जगविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे भयावह वास्तव समोर आले आहे.

Ground Report: पावसाळ्यातील निसर्गसंपन्न कोपरे-मांडवेची उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण

नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील नीळगव्हाण येथे असलेल्या या गोशाळेत सध्या 1200 गायी आहेत. पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा अभूतपूर्व अशी चारा-पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्याचा फटका गोशाळेतील या गायींना देखील बसत आहे. चाऱ्याची कमतरता भासू लागताच गोशाळा संचालकांनी तहसिलदारांना जानेवारी महिन्यातच अर्ज देवून चाऱ्याची मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे टरबूज-खरबूज खाऊ घालून गायींना जगविण्याचा प्रयत्न केला जात आहे. चाऱ्याची सवय असलेल्या गायींचे टरबूज-खरबूजने पोट भरत नसल्याने त्या कमकुवत होऊन त्यांचे हाडे दिसू लागली आहे. या गायींना वाचविण्याचे असेल तर त्यांच्यासाठी तातडीने चारा-पाण्याची व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे आहे.

सूडाने पेटलेल्या माथेफिरूने विहिरीच्या पाण्यात टाकले विष, संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न

Loading...

केवळ मालेगाव तालुक्यातच नव्हे तर नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात ठिकठिकाणी हीच परिस्थिती आहे. मागणी करून देखील अद्याप या भागात एक ही चारा छावणी सुरु झाली नाही. त्यामुळे चारा-पाण्याविना पशुधन जगवावे तरी कसे, असा प्रश्न शेतकरी व पशुपालकांना पडल्याचे मालेगाव येथील गोशाळा-गोरक्षक समितीचे सदस्य सुभाष मालू यांनी सांगितले.

सोलापुरातील आधुनिक भगीरथ..गावाला पाणी देण्यासाठी त्याने विकले आईचे दागिने

आमच्याकडे चारा छावणीबाबत मागणी आलेली नाही. आम्ही गोशाळाना भेट दिली आहे, या भागात चारा छावण्या सुरु करणे गरजेचे असून त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे मालेगावचे तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांनी सांगितले आहे.


SPECIAL REPORT:यंदा वरुणराजा बरसणार की रुसणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 18, 2019 07:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...