Ground Report: पाण्यासोबत खातोय भाकर.. जहर आणून खायचं म्हटलं तर पैसे नाही!

Ground Report: पाण्यासोबत खातोय भाकर.. जहर आणून खायचं म्हटलं तर पैसे नाही!

गेल्या वर्षी जे पेरले ते उगवलं नाही, जे आलं ते विकायची पंचाईत...त्यामुळे परिस्थिती अत्यंत बिकट आहे. मागच्या वर्षी पेरलेल्या बी-बियाण्याचा खर्च आणि मजुरीही निघाली नाही. यावर्षी आता नांगरायला, मोगडा, पाळी करायला पैसे नाहीत.

  • Share this:

बीड, 17 मे- गेल्या वर्षी जे पेरले ते उगवलं नाही, जे आलं ते विकायची पंचाईत...त्यामुळे परिस्थिती अत्यंत बिकट आहे. मागच्या वर्षी पेरलेल्या बी-बियाण्याचा खर्च आणि मजुरीही निघाली नाही. यावर्षी आता नांगरायला, मोगडा, पाळी करायला पैसे नाहीत. छावण्यामुळं जनावरं जगली अन्यथा सोडून द्यावी लागली असती. आमचं खूप अवघड झालं आहे. तीन तीन दिवस कालवण नसतं. चटनी, मीठ टाकून पाण्यासोबत भाकरी खावी लागते. परिस्थिती खूप बेताची झाली आहे. जहर आणून खायचं म्हटलं तर पैसे नाही. दाव घेवून फाशी घ्यायची वेळ आली.असं मनोज बेंद्रे या शेतकऱ्यांनं वैतागून दुष्काळाचे दुःख सांगितले. हतबल झालेली माणसं आज गावागावात चिंताग्रस्त अवस्थेत दिसत आहे.

बीड जिल्ह्यातील चिंचोलीमाळी गावातील मनोज बेंद्रे या शेतकऱ्यांच्या कुटुंबात 10 माणसं आहेत. 58 वर्षीय आई कौशल्यबाई या नेहमीच आजारी असतात. हप्त्याला दीड हजार रुपये हॉस्पिटलला लागतात, त्यातच 65 वर्षीय वडील आसाराम हे काम करू शकत नाहीत. एक भाऊ आहे तो यावर्षी पुण्याला कंपनीत कामाला निघून गेला. साडे चार एकर जमिनीत यंदी काहीच पिकले नाही. कुटुंबांचा खर्च भागवण्यासाठी इकडे तिकडे मंजुरी करत होतो. पण तेही मिळत नाही. घरात दोन मुले शाळेत जातात. त्यांचे अॅडमिशन म्हणून तिथे पैसे लागणार. शेतीची मशागत आणि मुलांच्या शाळेचा खर्च याच महिन्यात येणार आहे. कसं करावं. बँका दारात उभ्या करत नाहीत. सरकारने मदत केली तरच पेरणी नाहीतर काहीच पर्याय उरला नाही.अशी व्यथा मनोज यानी मांडली. इतर शेतकऱ्यांची परिस्थिती काही वेगळी नाही.

उन्हाळी कामे आणि शेतीची मशागत करण्यासाठी पैसे नाहीत. नांगरणीसाठी हेक्टरी पाच हजार रुपये खर्च येतो. मोगडनी, आणि पाळी पेरणीसाठी येणारा खर्च मोठा आहे. बी- बियाणे, खत यासाठी हेक्टरी 25 हजार रुपये लागतात. हे पैसे कसे जमा करावे. आज शेतात उभी पळाटी आहे. शेत नांगरणी केली नाही. खूप अवघड परिस्थिती आहे. कर्ज माफी गावातील काहीच लोकांना मिळाली. नवीन कर्ज मिळणं दुरापास्त आहे, गाव सोडून जावं की काय काही सूचत नाही, अशी व्यथा चिंचोलीमाळी गावातील इतर शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. मुलांच्या शाळेच्या फी, वयोवृद्ध लोकांच्या आरोग्यच्या समस्या, आपत्कालीन खर्च हे निभवायचं कसं अशीच भयावह परिस्थिती इतर शेतकऱ्यांची आहे. मुलांच्या शाळेत पाठवायचं कसं वह्या पुस्तकांसाठी पैसे आणावे कोठून.. सावकर सुद्धा पैसे देत नाही. बँका तर दारात ही उभा करतं नाही कस करावं... सरकारने दुष्काळी भागातील शेतकऱ्याला मदत केली तरच शेतकरी स्थलांतर थांबणार आहे. अन्यथा, गाव सोडून जाण्याशिवाय पर्याय नाही, अशी भयानक परिस्थिती दुष्काळी भागात पाहायला मिळत आहे. रखडलेली कामे..शेतातील निष्पर्ण...खुरटी पिके दिसत आहे.

राज्यात पुन्हा धडकणार उष्णतेची लाट, पाहा SPECIAL REPORT

First published: May 17, 2019, 10:05 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading