Home /News /maharashtra /

BREAKING: मुंबईतील मालाडमध्ये दुमजली घर कोसळलं, 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

BREAKING: मुंबईतील मालाडमध्ये दुमजली घर कोसळलं, 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

मुंबईतील मालाडमध्ये अब्दुल हमीद मार्गावरील मालवणी परिसरात एक दुमजली घर कोसळलं आहे.

मुंबई, 16 जुलै: मुंबईतील मालाडमध्ये अब्दुल हमीद मार्गावरील मालवणी परिसरात एका चाळीतील दुमजली घर कोसळलं. ही दुर्घटना गुरूवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. ढिगाऱ्याखाली दबून एका 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर 6 नागरिकांना बाहेर काढण्यात आलं आहे. रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. हेही वाचा...धक्कादायक! महाराष्ट्राच्या आणखी एका माजी मुख्यमंत्र्यांचा कोरोना, पुण्याला हलवलं अग्निशमन दलाच्या 4 गाड्या, 1 रेस्क्यू व्हॅन आणि 108 क्रमांकाची रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आतापर्यंत 6 नागरिकांना बाहेर काढलं आहे. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. या घटनेमुळे मालाड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मुंबई, कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा मुंबईसह उपनगरात 15 जुलै आणि 16 जुलैला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण परिसरात मुसळधार होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर राज्यभरात हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हेही वाचा...मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहमंत्र्यांप्रमाणे रझा अकादमीची पाठराखण करतात का? त्याच प्रमाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहराला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.  कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

तुमच्या शहरातून (मुंबई)

Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या