मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अंगावरील हळद उतरण्याआधीच पुसलं कुंकू; लग्नाच्या आठव्या दिवशी नवरदेवाचा दुर्दैवी अंत

अंगावरील हळद उतरण्याआधीच पुसलं कुंकू; लग्नाच्या आठव्या दिवशी नवरदेवाचा दुर्दैवी अंत

Crime in Jalgaon: जळगाव जिल्ह्याच्या सावदा याठिकाणी मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. लग्नाच्या आठव्या दिवशीच येथील एका युवकाचा भयावह शेवट झाला आहे.

  सावदा, 01 जानेवारी: जळगाव (jalgaon) जिल्ह्याच्या सावदा याठिकाणी मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. लग्नाच्या आठव्या दिवशीच येथील एका युवकाचा भयावह शेवट झाला आहे. अंगावरील हळद उतरण्याआधीच कुंकू पुसल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. कामावरून परत घरी येत असताना, एका अज्ञात वाहनाने संबंधित तरुणाला उडवलं आहे. या अपघातात नववराचा जागीच मृत्यू (Death in road accident) झाला आहे. अपघाताची ही घटना समोर येताच गावात शोककळा पसरली असून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. सचिन चिंतामण चौधरी असं अपघातात मृत पावलेल्या 26 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो सावदा येथील उधळी गावातील रहिवाशी होता. घटनेच्या दिवशी 30 डिसेंबर रोजी मृत सचिन दीपनगर येथून कामावरून आपल्या घरी परतत होता. दरम्यान रात्री साडेदहाच्या सुमारास फुलगाव येथील फ्लाय ओव्हरजवळून जात असताना, एका अज्ञात वाहनाने सचिनला जोरदार धडक दिली आहे. हा अपघात इतका भयंकर होता, की सचिनचा जागीच मृत्यू झाला आहे. हेही वाचा-पार्टीला बोलावून होणाऱ्या बायकोसोबत विकृत कृत्य; मग विचित्र कारण देत मोडलं लग्न पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील उधळी येथील रहिवासी असणाऱ्या 26 वर्षीय सचिन चौधरी याचा मुक्ताईनगर येथील एका तरुणीशी विवाह झाला होता. 24 डिसेंबर रोजी दोघांकडील कुटुंबीयांनी अगदी थाटामाटात दोघांचा विवाह लावून दिला होता. या लग्नात अनेक पाहुणे आणि मित्रपरिवार देखील उपस्थित होता. संसार वेल बहरण्याच्या आधीच काळाने घात केला. अवघ्या आठ दिवसांत तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. या घटनेनं संपूर्ण परिवारावर शोककळा पसरली आहे. हेही वाचा-परीक्षा देऊन घरी येत होती तरुणी,संध्याकाळी फोनवर वडिलांना मिळाली वेदनादायक बातमी मृत सचिन हा भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथील एका पॉवर हाउसमध्ये नोकरीला होता. 30 डिसेंबर रोजी तो नेहमीप्रमाणे कामावर गेला होता. कामावरून घरी परतत असताना त्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. 31 रोजी दुपारी शोकाकूल वातावरणात सचिनवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यावेळी अंत्यसंस्काराला उपस्थित असणाऱ्या अनेकांचे डोळे पाणावले होते.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Accident, Crime news, Jalgaon

  पुढील बातम्या