मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अंगावरील हळद उतरण्याआधीच पुसलं कुंकू; लग्नाच्या तिसऱ्या दिवशी नवरदेवानं संपवलं जीवन

अंगावरील हळद उतरण्याआधीच पुसलं कुंकू; लग्नाच्या तिसऱ्या दिवशी नवरदेवानं संपवलं जीवन

Suicide in Beed: दोन दिवसांपूर्वी थाटात लग्न केलेल्या एका तरुणानं सत्यनारायणाची पूजा संपताच शेतात जाऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Suicide in Beed: दोन दिवसांपूर्वी थाटात लग्न केलेल्या एका तरुणानं सत्यनारायणाची पूजा संपताच शेतात जाऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Suicide in Beed: दोन दिवसांपूर्वी थाटात लग्न केलेल्या एका तरुणानं सत्यनारायणाची पूजा संपताच शेतात जाऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बीड, 22 नोव्हेंबर: दोन दिवसांपूर्वी थाटात लग्न केलेल्या एका तरुणानं सत्यनारायणाची पूजा संपताच शेतात जाऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जोडप्याच्या नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी सत्यनारायण पूजा (Satyanarayan worship) केली. मात्र नवरदेवानं लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी आत्महत्या (Groom commits suicide after 3 days of marriage) केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित घटना बीड (Beed) जिल्ह्यातील नित्रुड येथे घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

पांडुरंग डाके असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. अंगावरची हळद उतरण्याआधीच नवरदेवाने आत्महत्या का केली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी तरुणानं आयुष्याचा शेवट केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून आत्महत्येचं कारण शोधणं पोलिसांसमोर मोठं आव्हान बनलंआहे.

हेही वाचा-दुर्देवी घटना; मुलाच्या जन्मदिनी केकवरील मेणबत्तीऐवजी आईची चिता जळाली

बीड जिल्ह्यातील नित्रुड येथील रहिवासी असणारे पांडुरंग रामकिसन डाके (26) हे शेती करत होते. त्यांचं शनिवारी (20 नोव्हेंबर)  माजलगाव येथील मुलीसोबत थाटामाटात लग्न झालं होतं. आज सकाळी दहाच्या सुमारास नव्या नवरी-नवरदेवासाठी घरी सत्यनारायण पूजा आयोजित करण्यात आली होती. लग्नानंतर नव्या आयुष्याची सुरुवात होणार असल्याने पांडुरंग आनंदित होता. मात्र सत्यनारायण झाल्यानंतर पाहुणे, ग्रामस्थांच्या पंगती बसलेल्या असताना पांडुरंग कोणालाही न सांगता थेट शेतात गेला. शेतात पांडुरंग याने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

हेही वाचा-रस्त्यावरील खड्ड्यामुळे गाडीला बसला हादरा अन्; छातीत गोळी घुसल्यानं जवानाचा अंत

शेजारील एका शेतकऱ्याने ही घटना पाहताच पांडुरंगच्या घरी याची माहिती दिली. माहिती मिळताच नातेवाईक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी माजलगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवला केला. पांडुरंगच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलं नाही. लग्नानंतर अवघ्या तिसऱ्या दिवशी नवरदेवाला मुखाग्नी द्यावा लागल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Beed, Crime news, Suicide