नवरदेवासह नातेवाईकांना अर्धनग्न करून केली मारहाण, धक्कादायक कारण समोर!

नवरदेवासह नातेवाईकांना अर्धनग्न करून केली मारहाण, धक्कादायक कारण समोर!

नवरदेव आणि त्याच्या नातेवाईकांना एका खोलून डांबून टाकलं. तसंच त्यांना अर्धनग्न करून मारहाण करण्यात आली.

  • Share this:

लखनौ, 7 डिसेंबर : लग्नासाठी आलेल्या नवरदेव आणि त्याच्या नातेवाईकांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसंच वैतागलेल्या वधू पक्षाने नवरीला लग्नात दिलेले दागिनेही परत घेतले आहेत. त्यानंतर वरपक्षाकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि हे नवरदेवाच्या नातेवाईकांची तिथून सुटका केली.

उत्तर प्रदेशमध्ये माजी मुख्यमंत्री सार्वजनिक विवाह सोहळा या योजनेत एका युवकाने दीड महिन्यांपूर्वी नांगलजट इथल्या एका तरूणीशी विवाह केला होता. मात्र नंतर पुन्हा सार्वजनकिरित्या सर्वांसमोर विवाह व्हावा, अशी अट विवाहित महिलेनं घातलं. त्यानुसार तरुणीच्या माहेरी म्हणजेच नांगलजट इथं पुन्हा दोघांचा विवाह करण्याचं ठरलं.

हेही वाचा: गृहकलह: बापानेच केली पोटच्या मुलाची हत्या, डोक्यात घातला हातोडा

लग्नाची वेळ दुपारची ठरवण्यात आली होती. मात्र नवरदेव आणि त्याचे नातेवाईक विवाहासाठी संध्याकाळी उशिरा पोहोचले. मग काय वैतागलेले वधू पक्षातील लोक थेट हातघाईवर आले. त्यांनी नवरदेव आणि त्याच्या नातेवाईकांना एका खोलून डांबून टाकलं. तसंच त्यांना अर्धनग्न करून मारहाण करण्यात आली, असा आरोप वरपक्षातील लोकांनी केला आहे.

हेही वाचा: महाराष्ट्रात हैदराबाद घटनेची पुनरावृत्ती, बलात्कारानंतर महिलेची चाकू भोसकून हत्या

तसंच नवरीला लग्नात देण्यात आल्याची 80 हजार रुपयांची रक्कम आणि काही दागिनेही माहेरच्या लोकांनी परत घेतले. वधू आणि वर पक्षातील हा हायव्होल्टेज ड्रामा बराच वेळ सुरू होता. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी सर्वात आधी डांबून ठेवण्यात आलेल्या वरपक्षातील लोकांची सुटका केली. तसंच आता दोन्हीकडील नातेवाईकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मात्र केवळ उशिरा आल्याच्या रागातून घडलेला हा प्रकार पंचक्रोशीत चर्चेचा विषय झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2019 03:56 PM IST

ताज्या बातम्या