नाती हरली! कोरोना पॉझिटिव्ह आजीचा अहवाल नातवानं केला गायब; कारण वाचून बसेल धक्का

नाती हरली! कोरोना पॉझिटिव्ह आजीचा अहवाल नातवानं केला गायब; कारण वाचून बसेल धक्का

सध्या अनेकजण आपल्या जीवाभावाच्या लोकांना वाचवण्यासाठी रुग्णालयाचे उंबरठे झिजवत आहेत. अशात साताऱ्यातील एका नातवानं आपल्या कोरोना पॉझिटिव्ह आजीचा अहवालचं गायब (grandson hide grandmothers corona positive report) केला आहे.

  • Share this:

सातारा, 04 मे: सध्या जगभर कोरोना विषाणूनं (Corona virus) थैमान घातलं आहे. त्यामुळे घरातील सदस्याला अगदी सर्दी जरी झाली तरी कुटुंबीय सतर्क होऊन आजारी सदस्यांची काळजी घेत आहेत. आपल्या जीवाभावाच्या लोकांना वाचवण्यासाठी अनेकजण रुग्णालयाचे उंबरठे झिजवत आहेत. अशात एका नातवानं आपल्या आजीसोबत धक्कादायक कृत्य केलं आहे. त्यानं आपल्या कोरोना पॉझिटिव्ह आजीचा अहवालच गायब (grandson hide grandmothers corona positive report) केला आहे. त्यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्यानं आजीचा मृत्यू झाला आहे.

संबंधित घटना महाराष्ट्रातील सातारा येथील असून येथील एका नातवानं आपल्या कोरोना पॉझिटिव्ह आजीचा अहवाल गायब केला होता. त्याचा हा लपवा छपवीचा खेळ मागील पाच- सहा दिवसांपासून सुरू होता. पण सहाव्या दिवशी त्याचं पितळ उघडं पडलं आहे.  म्हातारवयात वृद्ध आजीचं संगोपन करावं लागू नये, म्हणून नातवानं हे अजब कृत्य केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ही माहिती समोर येताच कुटुंबीयासोबत आरोग्य कर्मचाऱ्यांचीही पायाखालची जमीन सरकली आहे. नातवानं कोरोना अहवाल लपवून ठेवल्याची माहिती उघड झाल्यानंतर आजीला रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा-10 दिवसात 2 सख्ख्या भावांचा कोरोनानं घेतला घास; वयोवृद्ध आई-वडिलांवर कोसळलं आभाळ

दैनिक पुढारीनं दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित मृत आजी काही दिवसांपूर्वी सातारा याठिकाणी आपल्या मुलीकडे राहायला आली होती. दरम्यान तिच्या मुलीला आणि जावयालाही कोरोनाची बाधा झाली. यामध्ये मुलीनं कोरोनावर यशस्वी मात केली. मात्र दुर्दैवानं यामध्ये जावयाचा मृत्यू झाला. जावयाचा मृत्यू होऊन काहीच दिवस लोटल्यानंतर आजीलाही कोरोनाची बाधा झाली. पण नातवानं तिचा कोरोना अहवाल लपवून ठेवला. त्यामुळे उपचार मिळण्यासाठी वेळ लागला यातच या वृद्ध महिलेचा दुर्दैवी अंत झाला आहे.

Published by: News18 Desk
First published: May 4, 2021, 2:37 PM IST

ताज्या बातम्या