शिर्डी, 03 मार्च : आयुष्याच्या प्रवासात उतारवयात एकटेच राहिलेल्या आजोबांनी आपला हक्काचा आधार शोधला आहे. या आजोबांनी 68 वर्षांच्या एकट्या असणाऱ्या आजीला आयुष्यभर साथ देण्याचं वचन देत लगीनगाठ बांधली आहे. शिर्डीमध्ये एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. या आजी-आजोबांना सुखी संसाराच्या शुभेच्छा देण्यासाठी अख्खा गाव जमला होता. शिर्डी इथे हा आदर्श विवाह मुला मुलींच्या नातेवाईकांच्या साक्षीने थाटामाटात पार पडला. 80 वर्षीय रुपवते हे सेवा निवृत्त पोस्ट मास्टर आहेत. त्यांच्या मुलगा गेल्यामुळे ते एकटेच असतात. तर वर्षांच्या सुमनबाई पवार या संगमनेर इथल्या रहिवासी आहेत. दोन्ही मुलींचे लग्न झाल्यानं त्याही घरी एकट्याच होत्या. उतार वयात दोघे एकटे असल्यानं ओळखीच्या लोकांनी ह्या विवाहाचा प्रस्ताव मांडला आणि ही घटना 16 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्षात उतरली आहे. अगदी थाटामाटात या दोघांचाही विवाह सोहळा नाशिक जिल्ह्यातील हिवरे गावात पार पडला.
हे वाचा-पाण्याच्या शोधात गच्चीवर आली माकडीण, पुढे काय घडलं पाहा VIDEO
सुमनताईच्या दोन्ही मुली, दोन्हीही परीवारातील सर्व नातलग या विवाहाला उपस्थित होते. उतारवयात हवी असणारी साथ लक्षात घेता दोन्हीकडील कुटुंबियांनी घेतलेला हा निर्णय नक्कीच इतरांना प्रेरणा देणारा आहे. असा हा आगळा वेगळा विवाह सोहळा बघून नक्कीच नवल वाटेल. अनेकदा सिनेमा किंवा सिरियलमध्ये अशा गोष्टी घडतात. मात्र हे प्रत्यक्षात घडल्याचं पाहायला मिळालं. नवल वाटलं असेल. मात्र या दोघांच्या धाडसाचं नक्कीच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. समाजातील कोणत्याही बदलाच्या गोष्टींना होणारा विरोध पत्करून त्यांनी घेतलेला हा निर्णय नक्कीच आदर्श देणारा आहे.
हे वाचा-इंग्रजीत घडाघडा बोलणाऱ्या 70 वर्षांच्या आजीला शशी थरूर किती मार्क देणार?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.