मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भास्कर पेरे पाटील यांच्या मुलीचा पराभव, अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धीत काय झालं?

भास्कर पेरे पाटील यांच्या मुलीचा पराभव, अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धीत काय झालं?

अण्णा हजारे यांच्या आदर्श गाव राळेगणसिद्धी ग्रामपंचायत निवडणुकीत काय होतं, याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती.

अण्णा हजारे यांच्या आदर्श गाव राळेगणसिद्धी ग्रामपंचायत निवडणुकीत काय होतं, याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती.

अण्णा हजारे यांच्या आदर्श गाव राळेगणसिद्धी ग्रामपंचायत निवडणुकीत काय होतं, याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती.

अहमदनगर, 18 जानेवारी : यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. आदर्श सरपंच अशी ओळख असणाऱ्या भास्कर पेरे पाटील यांच्या पाटोदा गावात पेरे पाटील यांच्या मुलीला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे राज्याचे लक्ष लागलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आदर्श गाव राळेगणसिद्धी ग्रामपंचायत निवडणुकीत काय होतं, याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती.

या निवडणुकीत लाभेष औटी आणि जयसिंग मापारी यांच्या राळेगणसिद्धी ग्रामविकास मंडळाने मोठ्या फरकाच्या मतांनी सर्व जागा जिंकत 9 - 0 ने विजय मिळवला आहे.

अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 45 वर्षांत एक दोन अपवाद वगळता राळेगणसिद्धीत बिनविरोध निवडणुकीची परंपरा होती. या वेळी आमदार निलेश लंके यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लाभेष औटी व जयसिंग मापारी यांचे दोन गट प्रथमच बिनविरोध निवडणुकीसाठी एकत्र आले होते. जिल्ह्यात सर्वात प्रथम राळेगणसिद्धीची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे त्यांनी जाहीर केले होते.

हजारे यांनीही यांनी या निर्णयाचे स्वागत केले होते. अपक्षांच्या गटांनी काही जागांवर उमेदवारी कायम ठेवल्याने फक्त 2 जागा बिनविरोध होऊन 7 जागांसाठी ग्रामपंचायत निवडणूक झाली होती. प्रचार होऊन मतदानही शांततेत पार पडले होते.

विजयानंतर औटी व मापारी यांच्यासह समर्थकांनी पद्मवती देवीचे दर्शन घेत गुलाल उधळून जल्लोष केला.

राळेगणसिद्धी ग्रामविकास मंडळाचे विजयी उमेदवार व मिळालेली मते : जयसिंग मापारी (विजयी, 385 मते) मंगल मापारी

(विजयी 410 मते) मंगल पठारे (विजयी 464 मते), लाभेश औटी

(विजयी 402मते ), सुनिता गाजरे (विजयी 460 मते), अनिल

मापारी (बिनविरोध), डॉ. धनंजय पोटे (विजयी 333 मते), मंगल

उगले (विजयी 316 मते), स्नेहल फटांगडे (बिनविरोध). तर किसन

पठारे, विजय पोटे, विजया पठारे, उज्वला गाजरे, शंकुतला औटी यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

First published:

Tags: Anna hazare, Gram panchayat