मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /महाराष्ट्रातील पहिला हाय प्रोफाईल ग्रामपंचायतीचा निकाल हाती, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी गड राखला

महाराष्ट्रातील पहिला हाय प्रोफाईल ग्रामपंचायतीचा निकाल हाती, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी गड राखला

 साताऱ्यात मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

साताऱ्यात मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

साताऱ्यात मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सातारा, 18 जानेवारी : सातारा जिल्ह्यातील 879 ग्रामपंचायतींमधील 123 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या, तर 98 ग्रामपंचायत अंशतः बिनविरोध झाल्या. त्यामुळे 652 ग्रामपंचायतींमध्ये मतदान झाले असून 9521उमेदवार रिंगणात उतरले होते. आज ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल असून जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. अशातच पहिला निकाल हाती आला असून कराड ग्रामपंचायतीमध्ये सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचं पॅनेल विजयी झालं आहे.

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलने विरोधकांचा 8-1 ने धुव्वा उडवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी साताऱ्यातून पहिली गुड न्यूज आल्याचं दिसत आहे. साताऱ्यात मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. साताऱ्यातील इतर ग्रामपंचायतींचा निकाल काय लागणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.

दरम्यान, राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींत प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 79 टक्के मतदान झाले, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली होती.

मदान यांनी सांगितले की, राज्यातील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा 11 डिसेंबर 2020 रोजी करण्यात आली होती. त्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अशंत: बिनविरोध झाल्या आहेत. सरपंच व सदस्यपदाच्या लिलावप्रकरणी नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील 162 ग्रामपंचायतींसाठी 20 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे. अशा विविध कारणांमुळे प्रत्यक्षात 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले.

गडचिरोली जिल्ह्यात 22 जानेवारी 2021 रोजी; तर अन्य सर्व जिल्ह्यांत 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. .

First published:

Tags: Gram panchayat, Satara (City/Town/Village), Satara news