थेट सरपंच निवडणुकीचा भाजपला फायदा,अनेक ग्रामपंचायतीत 'कमळ' उमललं

थेट सरपंच निवडणुकीचा भाजपला फायदा,अनेक ग्रामपंचायतीत 'कमळ' उमललं

थेट सरपंच निवडणुकीत भाजपाला मोठा फायदा झालाय. जवळपास सर्वच ग्रामपंचायतीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत.

  • Share this:

09 आॅक्टोबर : राज्यातील 16 जिल्ह्यातील 3 हजार 131 ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आता जवळपास स्पष्ट होत आहे. थेट सरपंच निवडणुकीत भाजपाला मोठा फायदा झालाय. जवळपास सर्वच ग्रामपंचायतीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेल्या ग्रामीण भागावर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपने पुन्हा एकदा थेट निवडीचा पर्याय स्वीकारला. थेट नगराध्यक्षपदाच्या फाॅर्म्युल्यामुळे भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भरघोस यश मिळालं होतं. त्यामुळेच देवेंद्र सरकारने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही थेट सरपंचपदाच्या निवडणुकीचा पर्याय पुढे केलाय. आणि या निर्णयामुळे भाजपला मोठा फायदा झालाय. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार बीड जिल्ह्यात 655 जागांपैकी 203 जागा भाजपने पटकावल्यात. तर लातूरमध्ये 324 जागांपैकी 250 जागांचा निकाल जाहीर झालाय. यात भाजपने 151 जागा जिंकल्या आहेत. अजून मतमोजणी सुरू आहे. संध्याकाळपर्यंत थेट सरपंच निवडीचा निकाल स्पष्ट होईल.

आतापर्यंत आलेल्या निकालानुसार,

बीड : ३५६ निकाल हाती (भाजप : २०३)

औरंगाबाद : ९० निकाल हाती (भाजप : ७२)

अहमदनगर : ११६ निकाल हाती (भाजप : ७९)

नंदूरबार : २८ निकाल हाती (भाजप : १७)

जळगांव : १०३ निकाल हाती (भाजप : ७८)

वाशीम : १२७ निकाल हाती (भाजप : ८६)

यवतमाळ : ९३ निकाल हाती (भाजप : ४४)

लातूर : २५० निकाल हाती (भाजप : १५१)

First published: October 9, 2017, 3:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading