कर्जत जामखेड, 18 जानेवारी : विधानसभा निवडणुकीनंतर आता ग्रामपंचायत निवडणुकीमध्येही (Gram Panchayat Elections) रोहित पवार यांनी राम शिंदेना जोरदार धक्का दिला आहे. राम शिंदे (Ram Shinde) यांच्या चौंडी या गावात रोहित पवारांच्या (Rohit Pawar) पॅनलने बाजी मारली आहे. चौंडीमध्ये रोहित पवारांच्या गटाला 9 पैकी 7 जागा मिळाल्या.
मागच्यावर्षी विधानसभा निवडणुकीमध्ये कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात सामना रंगला होता. या निवडणुकीत रोहित पवार यांनी बाजी मारली आणि पहिल्यांदाच विधानसभेत धडक दिली. विधानसभा निवडणुकीच्या काही वर्ष आधीपासूनच रोहित पवारांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात लक्ष घालायला सुरूवात करून मोर्चेबांधणी केली होती, ज्याचा फायदा त्यांना विधानसभा आणि आता ग्रामपंचायत निवडणुकीतही झाला.
Gram Panchayat Results : पृथ्वीराज चव्हाणांना धक्का, भाजपने उडवला धुव्वा
एकीकडे राम शिंदे यांच्या होम ग्राऊंडवर रोहित पवारांचं पॅनल जिंकत असतानाच दुसरीकडे रोहित पवार मात्र बारामतीमध्ये आहेत. बारामतीमधल्या कृषिक 2021 मध्ये रोहित पवार हे पवार कुटुंबियांसह सहभागी झाले आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार, कृषी मंत्री दादा भुसे यांच्यासह रोहित पवारांनी या कृषी प्रदर्शनाची सकाळीच पाहणी केली.
Gram Panchayat Results : शिवसेना-काँग्रेसने उलथवली राष्ट्रवादीची सत्ता
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.