#आखाडाग्रामपंचायतींचा, दुसऱ्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात

#आखाडाग्रामपंचायतींचा, दुसऱ्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात

: आज राज्यातील दुसऱ्या टप्प्यातल्या ग्रामपंचायतींसाठी मतदान होतंय. सकाळी साडे सात वाजता मतदान सुरू झालंय.

  • Share this:

16 आॅक्टोबर : आज राज्यातील दुसऱ्या टप्प्यातल्या ग्रामपंचायतींसाठी मतदान होतंय. सकाळी साडे सात वाजता मतदान सुरू झालंय. गडचिरोली इथं सात वाजताच मतदान सुरू झालंय.  एकूण 3 हजार 692 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे.

जाहीर कार्यक्रमानुसार 4 हजार 119 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार होती. पण 380 ग्रामपंतायतींमध्ये बिनविरोध निवडणुका झाल्या आहेत.  पहिल्या टप्प्यात या निर्णयाचा भाजपला चांगला फायदा झाल्याचं दिसलं. आता दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांसाठीही राजकीय पक्ष कामाला लागलेत. या टप्प्यात कोण बाजी मारणार हे पाहाणं महत्वाचं आहे.

इथं होणार मतदान

जिल्हा               ग्रामपंचायती  

ठाणे                    41

पालघर                 56

रायगड                 242

रत्नागिरी               222

सिंधुदुर्ग                325

पुणे                      221

सोलापूर                192

सातारा                  319

सांगली                  453

कोल्हापूर              478

नागपूर                  238

वर्धा                    112

चंद्रपूर                   52

भंडारा                  362

गोंदिया                 353

गडचिरोली             26

गडचिरोलीत सुरक्षा दल सज्ज

गडचिरोली जिल्ह्यातील 26 ग्रामपंचायतींसाठी सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरूवात झालीय. माओवाद प्रभावीत भागातील निवडणूक सुरक्षित पार पडावी यासाठी सुरक्षा दल सज्ज झालंय. छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या या सिरोंचा तालुक्यात सर्वाधिक ग्रामपंचायत संवेदनशील असल्याने याठिकाणी मोठा पोलीस पथक सज्ज आहे. मतदानाच्या चोवीस तासांपूर्वीच पोलीस केंद्रावर दाखल झाले होते. माओवाद्यांकडून नेहमीच होणारा घातपात पाहता सुरक्षेत वाढ करण्यात आलीय.

पश्चिम महाराष्ट्रात दिग्गजांची प्रतिष्ठापणाला

पश्चिम महाराष्ट्रात आज कोल्हापूर,सातारा, सांगली या तिन्ही जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून तीनही जिल्ह्यांमध्ये प्रशासकीय यंत्रणा या मतदानासाठी सज्ज झाली आहे.

गेल्या महिन्याभरापासून गावागावांमध्ये प्रचाराचा धुरळा उडाला होता आणि गावपातळीवरचे नेते म्हणजेच ग्रामपंचायत सदस्यांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 439 आणि सांगली जिल्ह्यातील 424 अशा 863 ग्रामपंचायतींसाठी आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गावागावात मतदान होणार आहे. या मतदानाच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांची प्रतिष्ठा ही पणाला लागली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील त्याचबरोबर शिवसेनेचे 6 आमदार या सगळ्यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे तर सांगली जिल्ह्यातही माजी मंत्री जयंत पाटील, पतंगराव कदम , आमदार सुमन पाटी , खासदार संजयकाका पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

कोल्हापूर

- 472 पैकी 33 ग्रामपंचायती बिनविरोध

- आज 439 ग्रामपंचायतींसाठी मतदान

- आतापर्यंत 38 सरपंचांची निवड बिनविरोध

- जिल्ह्यातील एकूण सदस्यसंख्या 4422

- मतदान केंद्र 1982

- मतदारांची संख्या 10 लाख 36 हजार

- अतिसंवेदनशील मतदान केंद्र 177

सांगली

- 453 पैकी 29 ग्रामपंचायती बिनविरोध

- आज 424 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

- 424 सरपंच पदासाठी 841 उमेदवार रिंगणात

- 1241 सदस्यपदांसाठी 8981 उमेदवार रिंगणात

- एकूण मतदार संख्या दहा लाख 36 हजार

- मतदान केंद्र 1926

- अतिसंवेदनशील मतदान केंद्र 18

सिंधुदुर्गात राणेंची प्रतिष्ठापणाला

सिंधुदुर्गात आज  सर्वाधिक म्हणजे 295 तर रत्नागिरीमध्ये 154 ग्रामपंचायतींसाठी मतदान होतंय. सर्वांचं लक्ष लागलंय ते सिंधुदुर्गाकडे....कारण आपल्या नव्या पक्षासह एनडीएत सामिल झालेले  नारायण राणे समर्थ विकास पॅनलकडून या निवडणुका लढवत आहे. सिंधुदुर्गात 29 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून त्यापैकी 27 सरपंच आपले असल्याचा दावा या आधीच राणेंनी केलाय. तर रत्नागिरीत 61 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून बहुसंख्य ग्रामपंचातींवर शिवसेनेने दावा केलाय.

नागपुरात 25 केंद्र अतिसंवेदनशील

नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये ७८७ मतदान केद्रांवर आज मतदान होतंय.  २५ केंद्रे संवेदनशील आहेत. वलनी, सिल्लेवाडा, नगरधन आणि खाप्यातील एक केद्र अतिसंवेदनशील आहे. या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील २२ पोलीस स्टेशनअंतर्गत ७६ गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे.

First published: October 16, 2017, 9:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading