Home /News /maharashtra /

एका अपक्ष उमेदवाराने करुन दाखवले, अमित देशमुखांच्या प्रयत्नाला बसली खीळ!

एका अपक्ष उमेदवाराने करुन दाखवले, अमित देशमुखांच्या प्रयत्नाला बसली खीळ!

मागील तीन टर्म देशमुख गटाच्या विरोधात ते निवडणूक लढवत होते. यावेळी 16 मतांनी त्याचा विजय झाला आहे.

    लातूर, 18 जानेवारी : ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल (Maharashtra Gram Panchayat Election Results 2021)आता हाती आले आहे. सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेसचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांना एका अपक्ष उमेदवाराने धक्का दिला आहे. अमित देशमुख यांना होमग्राऊंड असलेल्या लातूरमध्ये धक्का बसला आहे. बाभळगावात अमित देशमुख गटाला एकहाती सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नाला खीळ बसली आहे. एका अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला आहे. बाभळगावात अमित देशमुख गटाच्या पॅनल विरोधात श्रीराम गोमरे हे अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. मागील तीन टर्म देशमुख गटाच्या विरोधात ते निवडणूक लढवत होते. यावेळी 16 मतांनी त्याचा विजय झाला आहे. 15 सदस्य असलेल्या ग्रामपंचतीच्या निवडणुकीत देशमुख गटाचे 7 सदस्य बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित 8 जागांसाठी निवडणूक झाली. गावात संपूर्ण लोकप्रतिनिधी देशमुख गटाचे असतील, असा  मानस देशमुख गटाने केला होता. मात्र, तो प्रयत्न अपक्ष उमेदवार निवडून आल्याने अपयशी ठरला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनाही धक्का बसला आहे. कराडमध्ये काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला अपयश, कराडच्या काले ग्रामपंचायतीत भाजपच्या (BJP) पॅनलला 14 जागा, तर पृथ्वीराज चव्हाण गटाला 3 जागा मिळाल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील 879 ग्रामपंचायतींमधील 123 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या, तर 98 ग्रामपंचायत अंशतः बिनविरोध झाल्या. त्यामुळे 652 ग्रामपंचायतींमध्ये मतदान झाले असून 9521उमेदवार रिंगणात उतरले होते. दुसरीकडे कराड ग्रामपंचायतीमध्ये मात्र सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलचा विजय झाला आहे. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलने विरोधकांचा 8-1 ने धुव्वा उडवला आहे. तर संगमनेरमध्ये विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यातला वाद हा सर्वश्रुत आहे. संगमनेर तालुक्यातील कनोली ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही नेते पुन्हा एकदा आमनेसामने उभे ठाकले होते. आज ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी झाली असता बाळासाहेब थोरातांना मोठा धक्का बसला आहे.  विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाने दणदणीत विजय मिळवला आहे. 11 जागेवर विखेंच्या जनसेवा मंडळाने विजय मिळवला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कनोली ग्रामपंचायतीत बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व होते. पण, आता सत्तांतर झाले असून विखे पाटलांच्या गटाने ग्रामपंचायतीचा ताबा घेतला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Gram panchayat

    पुढील बातम्या