मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Gram Panchayat Results : या ग्रामपंचायत निवडणुकींचे निकाल ईश्वर चिठ्ठीने!

Gram Panchayat Results : या ग्रामपंचायत निवडणुकींचे निकाल ईश्वर चिठ्ठीने!

राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांचं (Gram Panchayat Election Results) चित्र आता हळू हळू स्पष्ट होऊ लागलं आहे. या निवडणुकांमध्ये अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे, तर काहींना आपला गड राखण्यात यश आलं आहे. या निकालांमधला एक निकाल अजब पद्धतीने घोषित करण्यात आला आहे.

पुढे वाचा ...

पुणे, 18 जानेवारी : राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांचं (Gram Panchayat Election Results) चित्र आता हळू हळू स्पष्ट होऊ लागलं आहे. या निवडणुकांमध्ये अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे, तर काहींना आपला गड राखण्यात यश आलं आहे. या निकालांमधला एक निकाल अजब पद्धतीने घोषित करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील चाले ग्रामपंचायत निवडणुकीत दोन सदस्यांना समसमान मतं पडल्यामुळे ईश्वर चिठ्ठीचा उपयोग करत निकाल जाहीर करण्यात आला. जर निवडणुकीमध्ये दोन्ही उमेदवारांना सारखीच मतं पडली तर, पुन्हा एकदा मतांची मोजणी करण्यात येते. या मोजणीनंतरही ही संख्या समान असेल, तर दोन्ही उमेदवारांच्या नावाची चिठ्ठी पाडली जाते, या चिठ्ठीमध्ये ज्या उमेदवाराचं नाव येईल, त्याला विजयी घोषित केलं जातं.

चाले ग्रामपंचायतीमध्ये रंजना दहीभाते आणि सीमा दहीभाते यांना प्रत्येकी 176 मतं पडली, यानंतर ईश्वरी चिठ्ठीचा वापर करण्यात आला आणि सीमा दहीभाते यांना विजयी करण्यात आलं. तर भरे ग्रामपंचायतीमध्येही विवेक ववले आणि जगदीश ववले यांना प्रत्येकी 148 मतं पडली. ईश्वर चिठ्ठीचा वापर करून जगदीश ववले विजयी झाले.

Gram Panchayat Results : शिवसेना-काँग्रेसने उलथवली राष्ट्रवादीची सत्ता

पुण्याच्या हिंजवडी ग्रामपंचायतीमध्ये म्हातोबा परिवर्तन पॅनलचा विजय झाला आहे. 17 पैकी तब्बल 15 जागांवर म्हातोबा परिवर्तन रॅलीने बाजी मारली आहे. तर मुळशीमधल्या 36 ग्रामपंचायतींमधल्या 222 जागांवर 515 उमेदवार रिंगणात आहेत.

राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींत प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 79 टक्के मतदान झाले. गडचिरोली जिल्ह्यामध्ये मात्र 22 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.

Gram Panchayat Results : रोहित पवारांचा पुन्हा एकदा राम शिंदेंना 'दे धक्का'

First published: