गडचिरोलीतील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा

गडचिरोलीतील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा

आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत.

  • Share this:

गडचिरोली, 22 जानेवारी : गडचिरोलीमध्ये  (Gadchiroli) दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायतीसाठी  (gram panchayat election result 2021 ) मतमोजणी सुरू आहे.  एकूण 350 ग्राम पंचायतीची मतमोजणी सुरू आहे. निकालाचा पहिला कल हाती आला असून सर्वात मोठी समजली जाणाऱ्या सिरोंचा तालुक्यातील झिंगानुर ग्राम पंचायतीवर महाविकास आघाडीने झेंडा फडकावला आहे.

राज्यातील 12 हजार 711 ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील गडचिरोली जिल्ह्यातील 350 ग्राम पंचायतीसाठी मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत.

सिरोंचा तालुक्यात झिंगानुर ग्राम पंचायत ही सर्वात मोठी समजली जाते. या ग्राम पंचायतवर महाविकास आघाडीने झेंडा फडकावला आहे. तर काँग्रेसनेही  खाते उघडले आहे. जिल्ह्यातील आदीमुत्तापुर ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे.

माओवादीग्रस्त असलेल्या गडचिरोली भागात दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. दुसऱ्या टप्प्यात 350 ग्राम पंचायतीसाठी तब्बल 80 टक्के मतदान झाले होते. आज सकाळी 8 वाजता संपूर्ण सुरक्षेत मतमोजणीला सुरुवात झाली. गडचिरोलीतील विठ्ठलराव पेठा ग्राम पंचायतीचा पहिला निकाल हाती आला आहे. या ग्रामपंचायतीवर  राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा फडकावला आहे.

तर देसाईगंज तालुक्यात आमगाव ग्राम पंचायतीमध्ये शिवसेनेनं बाजी मारली आहे. शिवसेनेचे सदस्य निवडून आले आहे. त्यापाठोपाठ सिरोंचा तालुक्यात मोयाबीनपेठा आणि नरसिंहापल्ली ग्राम पंचायतमध्ये आदिवासी विद्यार्थी संघटना (आविस) ने विजय मिळवला आहे. आविसाने

परसेवाडा ग्राम पंचायत, गर्कपेठा ग्राम पंचायत आणि वेंकटापुर ग्राम पंचायतीवर आपला झेंडा फडकावला आहे.

Published by: sachin Salve
First published: January 22, 2021, 12:07 PM IST

ताज्या बातम्या