मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

कोरोनामुळे स्थगित केलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांबाबत आयोगानं केली मोठी घोषणा

कोरोनामुळे स्थगित केलेल्या ग्रामपंचायत निवडणूकांबाबत आयोगानं केली मोठी घोषणा

आता मतदार यादी आणि प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम नव्याने जाहीर होणार

आता मतदार यादी आणि प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम नव्याने जाहीर होणार

आता मतदार यादी आणि प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम नव्याने जाहीर होणार

  • Published by:  Sandip Parolekar
मुंबई, 19 नोव्हेंबर: राज्यभरातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा (Grampanchayat Election) कोविड-19 मुळे (Coronavirus) स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम आता रद्द करण्यात आला असून तो नव्याने जाहीर करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान (Maharashtra Election Commissioner) यांनी गुरुवारी केली. राज्यातील 19 जिल्ह्यांतील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 24 फेब्रुवारी 2020 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते; परंतु कोविडची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी उमेदवारी अर्ज छाननीच्या टप्प्यावर हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त मदान यांनी दिली. हेही वाचा..4 सख्ख्या भावांनी अल्पवयीन मुलीवर केला अतिप्रसंग, व्हिडीओ क्लिपही बनवली तत्पूर्वी 31 जानेवारी 2020 पर्यंत अद्ययावत केलेली विधानसभेच्या मतदार यादीवरून ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदार याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या. विधानसभेची ही मतदार यादी 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित होती; परंतु भारत निवडणूक आयोगाने आता 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित अद्ययावत मतदार यादी 25 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे नव्याने मतदार यादीत नाव नोंदविलेल्यांना निवडणूक लढविता यावी किंवा मतदान करता यावे म्हणून राज्य निवडणूक आयोगाच्या 5 फेब्रुवारी 2020 च्या आदेशान्वये ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेली मतदार यादी देखील रद्द करण्यात आली आहे. परिणामी आता या निवडणुकांसाठी मतदार यादी आणि प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम नव्याने जाहीर केला जाणार आहे. महाआघाडीत खळबळ, स्वबळावर लढविण्याची काँग्रेसची घोषणा... दरम्यान, मुंबई महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. महापालिकेतले विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी ही घोषणा केलीय. महाविकास आघाडीमध्ये जरी काँग्रेस शिवसेनेसोबत असली तरी महापालिकेत आम्ही स्वबळावर जाण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेसच्या या घोषणेमुळे महाआघाडीत खळबळ उडाली आहे. या आधी येणाऱ्या सर्व निवडणुका या एकत्रितपणे लढविल्या जातील अशी घोषणा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. शिवसेनेसाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या निवडणुका असून काँग्रेसच्या या घोषणेमुळे आघाडीच्या घोषणेचं काय असा प्रश्न आता विचारला जातोय. शिवसेनेनेसोबत गेलं तर पारंपारिक मतदार दुरावण्याची भिती काँग्रेसला वाटते आहे. त्यामुळे या निवडणुका या स्वबळावर लढविण्याचा निर्णय काँग्रेसने घेतल्याची चर्चा सुरू आहे. हेही वाचा...पंढरपुरात महाविकास आघाडी धक्का, भाजप उमेदवाराला 'या' संघाने दिला पाठिंबा भाजपने सुरू केली तयारी विधानसभा निवडणुकीनंतर भाजपपासून फारकत घेत शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. त्यानंतर सेना-भाजपमध्ये जोरदार राजकीय कलगीतुरा रंगत आहे. अशातच आता शिवसेनेचं वर्चस्व असणारी मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजपच्या मुंबई कार्यकारिणीच्या बैठकीत 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई मनपाच्या निवडणुकीसाठी भाजपचे कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई भाजप कार्यकारिणीत याबाबतची घोषणा झाली.
First published:

Tags: Corona, Coronavirus, Coronavirus symptoms, Election, Maharashtra, World After Corona

पुढील बातम्या