चंद्रपूर, 18 जानेवारी : राज्यातल्या ग्रामपंचायतींचे निकाल (Gram Panchayat Election Results) यायला आता सुरूवात झाली आहे. या निकालांमध्ये काही ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसला आहे, तर काहींना त्यांचे गड राखण्यात यश आलं आहे. एकीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या गावातच भाजपच्या पॅनलचा पराभव झाला आहे, तर दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी मात्र त्यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार कामगिरी केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत आलेल्या निकालांपैकी 9 ठिकाणी भाजपचा, तर 3 ठिकाणी काँग्रेस, 1 ठिकाणी राष्ट्रवादी, 1 ठिकाणी शिवेसना आणि एकेठिकाणी अपक्ष विजयी झाले आहेत.
महाराष्ट्रातले काँग्रेसचे एकमेव खासदार असलेल्या बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) हे चंद्रपूर जिल्ह्यातलेच आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी त्यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान दोनच दिवसांपूर्वी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) आव्हान दिलं होतं. काँग्रेस पक्षाने जर संधी दिली तर थेट वाराणसीमध्ये जाऊन नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढवू. पक्षाने आदेश दिला तर मोदींचा ट्रम्प केल्याशिवाय राहणार नाही, असं बाळू धानोरकर म्हणाले होते.
चंद्रपूर
=========
तालुका - पोंभुर्णा- मुनगंटीवार यांचा मतदारसंघ
चिंतलधाबा (भाजप)
घोसरी (काँग्रेस)
दीघोरी (शिवसेना)
नवेगाव मोरे (अपक्ष)
=========
तालुका - वरोरा, काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर यांचा मतदारसंघ
नागरी (काँग्रेस)
उखर्डा (बीजेपी)
जामखुला (काँग्रेस)
=====
तालुका - गोंडपिंपरी, काँग्रेस आमदार सुभाष धोटे यांचा मतदारसंघ
भंगाराम-तळोधी (भाजप)
खरारपेठ (भाजप)
लिखितवाडा (भाजप)
धानापूर (भाजप)
वढोली (राष्ट्रवादी)
धाबा (भाजप)
=========
तालुका - चंद्रपूर, अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांचा मतदारसंघ
वरवट (भाजप)
बोर्डा (भाजप)
=======
भाजप - ९
काँग्रेस - ३
राष्ट्रवादी काँग्रेस - १
सेने - १
अपक्ष - १
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.